Pakistan Economy Crisis: बेडक्या फुगवून भारताला आव्हान देणाऱ्या पाकिस्तानचे होणार तुकडे? भारताकडे मोठी सुवर्णसंधी!

Pakistan Economy Crisis: पाकिस्तान सध्या राजकीय संकटात (Pakistan Political Crisis) सापडल्याचं पहायला मिळतंय. शाहबाज शरीफ विरुद्ध इम्रान खान असा राजकीय खेळखंडोबा सुरू आहे. महागाईमुळं जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.

Updated: Jan 20, 2023, 08:03 AM IST
Pakistan Economy Crisis: बेडक्या फुगवून भारताला आव्हान देणाऱ्या पाकिस्तानचे होणार तुकडे? भारताकडे मोठी सुवर्णसंधी! title=
Pakistan Economy Crisis

Pakistan Economy Crisis : दहशतवाद्यांना खतपाणी घालणं असो किंवा आर्थिक चुकीचं धोरण यामुळे पाकिस्तानची (Pakistan Economy Crisis) नेहमी आंतरराष्ट्रीय मंचावर नाचक्की झाली आहे. नैसर्गिक संकट आणि सरकारी उदासिनतेनं पाकिस्तानात गव्हाचं संकट (Pakistan Wheat Crisis) दिवसेंदिवस भीषण बनत चाललंय. पाकिस्तानच्या बलुचिस्तानातमधील काही भयानक व्हिडिओ समोर आले होते. मात्र, राज्यकर्त्यांना काडीचं भान नसल्याचं पहायला मिळतंय. वेळ पडली तर अंगावरच कपडे विकेन, पण गव्हाचे दर वाढू देणार नाही, असं पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफांनी (Shehbaz Sharif) म्हटलं होतं. मात्र, आता पाकिस्तानचा कंगाल होणार असल्याचं दिसतंय. अशातच आता मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. (Pakistan Economy Crisis Poor Pak on the brink of bankruptcyWill India take over POK Marathi News)

बेडक्या फुगवून भारताला आव्हान देणाऱ्या पाकिस्तानचं खरं वास्तव आता समोर येऊ लागलंय. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीमुळं (economic crisis in pakistan) पाकिस्तान एवढा कंगाल आणि कमजोर झालाय की, 2023 मध्ये (pakistan crisis news) पाकिस्तानचे तुकडे होऊ शकतात, असं भाकीत वर्तवण्यात आलंय. एवढंच नव्हे तर पाकिस्तानसोबत युद्ध करण्यासाठी भारताकडे कधी नव्हे एवढी अनुकूल परिस्थिती निर्माण झालीय. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची नामी संधी भारताकडं आहे, असं मत अमेरिकेतील डेलावेयर युनिवर्सिटीतले इस्लामिक स्टडीजचे संचालक प्रा. मुक्तदर खान (Prof Muktdar Khan) यांनी व्यक्त केलंय.

पाकिस्तान सध्या राजकीय संकटात (Pakistan Political Crisis) सापडल्याचं पहायला मिळतंय. शाहबाज शरीफ विरुद्ध इम्रान खान असा राजकीय खेळखंडोबा सुरू आहे. महागाईमुळं जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. अफगाणिस्तानातील तालिबानमुळं पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षा (Internal Security) धोक्यात आली आहे. या सगळ्या संकटांमुळं पाकिस्तानचे तुकडे तुकडे होऊ शकतात, असा इशारा प्रा. मुक्तदर खान यांनी दिला आहे. त्यामुळे आता भारताकडे मोठी संधी चालून आली आहे.

आणखी वाचा - Dawood Ibrahim rules Karachi airport: कराची विमानतळ दाऊदच्या नियंत्रणात, NIA चा मोठा खुलासा

दरम्यान, पाकिस्तानला वास्तवाचा आरसा दाखवताना त्यांनी भारत सरकारचं कौतुक केलं. पाकिस्तान सरकारसारखी भारत सरकारची विचारसरणी नाही. नाहीतर युद्ध पुकारून पाकव्याप्त काश्मीर (POK) ताब्यात घेण्याची नामी संधी भारताकडे आहे. मात्र भारत अशाप्रकारे युद्ध सुरू करणार नाही, असंही ते म्हणाले. सगळ्या बाजूंनी पिचलेला पाकिस्तान निदान आता तरी सुधारेल, अशी अपेक्षा केली जात आहे. नाहीतर पाकिस्तानच्या वळवळणाऱ्या नांग्या ठेचण्यासाठी भारत समर्थ आहेच.