आजोबा जोमात! वयाच्या 110 व्या वर्षी 5 हजार हुंडा देऊन केले चौथे लग्न

Pakistan Viral Story: आपल्या शेजारील राष्ट्र पाकिस्तान हे वेगवेगळ्या कारणांनी जगभरता चर्चेत येत असते. आता येथील एक कुटुंब चर्चेत आले आहे. येथील कुटुंब प्रमुख वयाच्या 110 व्या वर्षी जिवंत आहे. याहून धक्कादायक म्हणजे त्यांनी या वयातही चौथे लग्न केले आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 22, 2023, 11:14 AM IST
आजोबा जोमात! वयाच्या 110 व्या वर्षी 5 हजार हुंडा देऊन केले चौथे लग्न title=

Pakistan Viral Story: लग्न करणं हे आपल्याकडे पवित्र बंधन मानले जाते.एक लग्न करुन आपल्या जोडीदारासोबत आयुष्य घालविण्याचा निर्णय अनेक जोडपी घेतात. पण काहीजणांचा एकापेक्षा अनेक लग्नांवर विश्वास असतो. अशावेळी ते आपलं वय देखील पाहत नाहीत. अशीच एक घटना आपण जाणून घेणार आहोत. आपल्या शेजारील राष्ट्र पाकिस्तान हे वेगवेगळ्या कारणांनी जगभरता चर्चेत येत असते. आता येथील एक कुटुंब चर्चेत आले आहे. येथील कुटुंब प्रमुख वयाच्या 110 व्या वर्षी जिवंत आहे. याहून धक्कादायक म्हणजे त्यांनी या वयातही चौथे लग्न केले आहे. 

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने 110 वयात चौथ्यांदा लग्न केले आहे. हा विवाह करण्यासाठी या व्यक्तीने 5000 रुपयांची मेहेरही दिली आहे. वयस्कर माणसाच्या या कारनाम्यामुळे आता या कुटुंबाची खूप चर्चा पाकिस्तानसोबतच जगभरात होत आहेत. कारण या 110 वर्षीय व्यक्तीच्या या कुटुंबात एकूण 84 लोक आहेत. आता ही संख्या आणखी कितीने वाढणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

अब्दुल हन्नान असे या ११० वर्षीय वृद्धाचे नाव आहे. अब्दुल हन्नानने आता आयुष्यातील चौथा विवाह केला. यावेळी त्यांनी 55 वर्षीय महिलेशी विवाह केला आहे. काझी मोहम्मद अर्शद यांच्या आशीर्वादाने हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला परिसरातील मोठ्या हस्तींनी उपस्थिती लावली. अनेक मान्यवर आपल्या परिवारासह येथे उपस्थित होते. मानसेरा जिल्ह्याचे माजी नगरसेवक खालिद खान यांनीही या लग्नाला हजेरी लावली आणि त्याचे साक्षीदारही बनले. उपस्थित वऱ्हाड्यांपैकी कोणालाही हा काही वेगळा प्रकार घडतोय असे वाटत नव्हते. कोणीही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित न करता आनंदाने सोहळ्यात सहभाग दर्शवला. 

गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांची घराच्या सोडतीसंदर्भात मोठी घोषणा

मुलगा सावत्र आईपेक्षा 15 वर्षांनी मोठा 

समोर आलेल्या वृत्तानुसार 110 वर्षीय अब्दुल हन्ना यांच्या कुटुंबात एकूण 84 लोक आहेत. अब्दुल हन्नान यांना एकूण तीन पत्नींपासून 12 मुले आहेत. यामध्ये 6 मुली आणि 6 मुलगे आहेत. अब्दुल हन्नाच्या भावा-बहिणींच्या मुला-मुलींची संख्याही मोठी आहे. अब्दुल हन्ना यांच्या मोठ्या मुलाचे वय 70 वर्षे आहे.

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदरमधील ट्रॅफीक कमी करण्यासाठी MMRDAचा मोठा निर्णय

अब्दुल हन्नानच्या मोठ्या मुलाचे वय त्याच्या चौथ्या पत्नीच्या वयापेक्षा 15 वर्षे जास्त आहे. 5000 रुपये हुंडा घेऊन पार पडलेल्या या निकाहमध्ये अब्दुल हन्नानच्या कुटुंबातील लोकही सहभागी झाले होते. काही दिवसांपुर्वीत पाकिस्तानमधील आणखी एका व्यक्तीने वयाच्या 90 व्या वर्षी दुसरं लग्न केलं होतं.