VIDEO : भर रस्त्यात क्रॅश झालं प्लेन

रस्त्यावरून चालताना एखादी कार आपल्या जवळून वेगाने गेली तर धक्का बसतो. तर मग विचार करा की, तुम्ही रस्त्यावर चालताय आणि तुमच्या बाजूला रस्त्यावर एक प्लेन क्रॅश होतय.

Updated: Nov 22, 2017, 12:07 PM IST
VIDEO : भर रस्त्यात क्रॅश झालं प्लेन title=

फ्लोरिडा : रस्त्यावरून चालताना एखादी कार आपल्या जवळून वेगाने गेली तर धक्का बसतो. तर मग विचार करा की, तुम्ही रस्त्यावर चालताय आणि तुमच्या बाजूला रस्त्यावर एक प्लेन क्रॅश होतय.

अशीच एक धक्कादायक घटना फ्लोरिडामध्ये घडली आहे.  पोलीस रस्त्यावर राऊंड मारत होते आणि अशातच त्यांनी एक विमान आकाशात गिरक्या मारत असल्याचं बघितलं. काही वेळातच ते प्लेन जमिनीवर आदळलं. हा सर्व प्रकार पोलीस व्हॅनच्या कॅमेरात कैद झाला आहे. 

ही घटना १९ नोव्हेंबरच्या सकाळी १० वाजता घडली. हे चार्टर प्लेन रस्त्यावर जोरात आदळलं आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांमध्ये जाऊ अडकलं. यात दोन लोक होते. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. पोलीस व्हॅन त्वरीत घटनस्थळावर पोहचली आणि त्यांना मदत केली. या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की किती मोठा अनर्थ टळला. 

प्लेनचा समोरचा भाग पूर्णपणे डॅमेज झालाय. प्लेन खाली येताना बघून रस्त्यावर अनेक गाड्यांनी जागेवरच ब्रेक लावले. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ फ्लोरिडा फायर आणि रेस्क्यू डिपार्टमेंटच्या फेसबुक पेजवर अपलोड केले आहे.