रेसिंगदरम्यान कारचा मोठा अपघात, भयानक घटनेचा व्हिडीओ व्हायरल

कार रेसिंगमध्ये अनेकदा भयानक अपघात घडतात. यासंबंधीत आपल्याला अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

Updated: Jun 26, 2022, 10:12 PM IST
रेसिंगदरम्यान कारचा मोठा अपघात, भयानक घटनेचा व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : कार रेसिंगमध्ये अनेकदा भयानक अपघात घडतात. यासंबंधीत आपल्याला अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. खरंतर या रेसिंग कार फॉर्म्युला 1 चा वेग ताशी 360 किलोमीटरपेक्षा जास्त होतो. अशा वेळी एक छोटीशी चूकही तुमचे आयुष्य संपवण्यासाठी पुरेशी असते. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो लोकांच्या अंगावर काटा आणणारा आहे. रेसिंग ट्रॅकवर दोन कार सुसाट वेगाने धावत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण अचानक असे काही घडते की, तुम्हीही घाबरून जाल. वास्तविक, या दोन्ही गाड्यांची एकमेकांशी जोरदार टक्कर होते. संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडीओ जरूर पाहा.

भयानक अपघात

दोन्ही कारची एवढी जोरदार टक्कर झाली की एका कारने दुसऱ्या कारवरच उडी मारली. रेसिंग ट्रॅकच्या वळणावर या दोन्ही वाहनांचा तोल बिघडला होता.

दोनपैकी एका कारचे मोठे नुकसान झाले. दोन्ही चालकांचे नशीब चांगले होते की दोघांचेही प्राण वाचले आहे. परंतु हा अपघात पाहता कोणी यातून वाचू शकेल असे वाटत नव्हते.

आतापर्यंत सुमारे 45 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेक यूजर्सनी (सोशल मीडिया यूजर्स) हा व्हिडीओ लाईकही केला आहे. मात्र हा व्हिडीओ पाहून सगळेच घाबरले आहेत. रेसिंग ट्रॅकवर असे अपघात होत असले तरी सर्वसामान्यांसाठी मात्र असे अपघात भयावह आहेत.