...आणि अंडरवेअरमध्ये साप पाहून पोलीस हडबडले

आपण साप पाहिला तरी आपल्या अंगावर काटा येतो. मात्र, जर्मनीतील डाम्सटॅट शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 9, 2017, 05:34 PM IST
...आणि अंडरवेअरमध्ये साप पाहून पोलीस हडबडले title=
Representative Image

जर्मनी : आपण साप पाहिला तरी आपल्या अंगावर काटा येतो. मात्र, जर्मनीतील डाम्सटॅट शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे.

झालं असं की, डाम्सटॅट शहरात एका दारुड्या टल्ली होऊन दुसऱ्या एका दारुड्यासोबत भांडण करत होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्या दोघांचं भांडण थांबवलं. त्यावेळी पोलिसांनी दोघांची तपासणी केली असता विचित्र प्रकार समोर आला.

दारुड्याची तपासणी करत असताना पोलिसांना त्याच्या अंडरवेअरमध्ये चक्क एक साप आढळला. या सापाची लांबी जवळपास ३५ सेमी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांना एक फोन कॉल आला की रस्त्यावर दोन जण भांडण करत आहेत. त्यानंतर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळी तपासणी करत असताना त्याच्या अंडरवेअरमध्ये एक साप आढळला.

आरोपीच्या अंडरवेअरमध्ये साप पाहून पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांच्या मते, आरोपी युवकाने आपल्या एखाद्या नातेवाईकाकडून साप आणला असावा. या प्रकरणी आरोपी युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक चौकशी करत आहेत.