अमेरिका-भारत तणाव, चीनला युद्धाची खुमखुमी

अमेरिका (America) आणि भारतासोबत (India) सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने (China) आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

Updated: Jan 6, 2021, 08:50 PM IST
अमेरिका-भारत तणाव, चीनला युद्धाची खुमखुमी   title=

मुंबई : अमेरिका (America) आणि भारतासोबत (India) सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने (China) आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणत्याही क्षणी युद्धाला सज्ज (China wants war) राहा, असे आदेश चीनच्या राष्ट्रपतींनी (China President) चिनी सैन्याला दिलेत. पाहूयात त्याबाबतचा हा खास रिपोर्ट.

चिनी ड्रॅगनची जीभ पुन्हा जोरानं वळवळ करू लागली आहे. भारत आणि अमेरिकेसोबत चीनचे संबंध ताणले गेलेत. त्यामुळं चिनी सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेशच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी दिलेत. 'सैनिकांची क्षमता वाढवण्यासाठी आघाडीवरील चकमकींचा उपयोग करून घ्या, सशस्त्र दलांनी युद्धजन्य स्थितीचा सराव करावा
तुम्ही सर्व काळ युद्धासाठी सज्ज असले पाहिजे, असा सल्ला जिनपिंग यांनी दिल्याचं 'शिन्हुआ' या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. 

सध्या भारत आणि चीन यांच्यातील लडाख सीमेवर तणावाची स्थिती आहे. चिनी लष्करानं भारतीय चौक्यांसमोर रणगाडे आणून ठेवल्याचा व्हिडिओ झी मीडियानं दाखवला होता. रेझांग ला, रेचिन ला आणि मुखशोरी भागात चिनी लष्कराचे सुमारे ३०-३५ रणगाडे दाखल झाल्याचा हा व्हिडिओ होता. ही शिखरे सध्या भारतीय लष्कराच्या ताब्यात आहेत.

जिनपिंग हे चिनी सैन्यदलाचे सरसेनापती आहेत.१ जुलैला चिनी कम्युनिस्ट पक्षाचा शंभरावा स्थापना दिन आहे. त्यानिमित्तानं नेत्रदीपक कामगिरी करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. आता थेट सरसेनापतींनीच आदेश दिल्याने चीनच्या कुरापती आणखी वाढणार, एवढं नक्की