Viral News: सोशल मीडियाच्या (Social media) जगात एखादी बातमी किंवा व्हिडीओ व्हायरल (Viral) व्हायला वेळ लागतं नाही. अशीच एक बातमी जगभरात वाऱ्यासारखी पसरली. ही बातमी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. जगात कधी काय होईल याची काही शाश्वती राहिलेली दिसतं नाही. अच्छा आम्हाला सांगा एखाद्या महिलेला आपण गर्भवती आहोत, हे माहित नाही...हे कसं शक्य होऊ शकतं. एका महिलेला बाळाच्या जन्माच्या काही तासांपूर्वी कळलं की ती आई होणार आहे. हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
ब्रिटीश वृत्तपत्र द सनच्या वृत्तानुसार, एका महिलेला (woman) एका दिवशी अचानक खूप थकवा जाणवला. ती व्यवसायाने शिक्षका (Teacher) असल्यामुळे आपल्याला कामामुळे थकवा आला असावा असं तिला वाटलं. नंतर काही दिवसानंतर तिचा पायावर सूज दिसली. त्यामुळे तिने शेवटी डॉक्टरांकडे (Doctor) जाण्याचा निर्णय घेतला. (Trending News woman unaware she is pregnant nmp)
डॉक्टरांनी तिची संपूर्ण तपासणी केली. त्यानंतर तिला गर्भधारणेच्या दोन चाचण्या (pregnancy tests) करण्यात आला आणि तिला सांगण्यात आलं की ती आई होणार आहे. तिचा या चाचण्यांवरही विश्वास बसत नव्हता. म्हणून तिची अल्ट्रासाऊंड (Ultrasound) टेस्ट करण्यात आली. ज्यावेळी या टेस्टदरम्यान टीव्हीवर गर्भात बाळाला पाहिल्यावर त्या महिलेला विश्वास बसला. पण तिला अजूनही काही कळतं नव्हतं की आपण गर्भवती (pregnant) आहोत हे आपल्याला कसं कळलं नाही.
महिलची किडनी (Kidney) आणि यकृत (Liver) नीट काम करत नव्हतं म्हणून तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिचा रक्तदाबही खूप वाढला होता. त्यामुळे 10 आठवड्यांपूर्वी डॉक्टरांनी सी-सेक्शनद्वारे बाळाची प्रसूती केली. जन्माच्या वेळी बाळाचे वजन 800 ग्रॅम होते.
अमेरिकेतील (America) नेब्रास्कामध्ये ही धक्कादायक प्रकरण घडलं आहे. जिथे एका महिलेला मुलाच्या जन्माच्या अवघ्या 48 तास आधी कळले की ती गर्भवती आहे आणि ती एका मुलाची आई होणार आहे. 23 वर्षीय पीटन स्टोवरसोबत ही घटना घडली आहे. यानंतर तिला कळले की तिचा बॉयफ्रेंड ट्रॅविस कोस्टरसोबत रिलेशनशिपनंतर ती आई होणार आहे. पेटन प्री-एक्लॅम्पसियाने (Pre-eclampsia) ग्रस्त होता, ज्यामुळे गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब (High blood pressure) होऊ शकतो.
या जोडप्याने सांगितले की, त्यांना एक दिवस मुलं हवी होती. पण चांगली गोष्ट म्हणजे तो आधी आला. घडलेल्या घटनेनंतरही या जोडप्याला अजूनही विश्वास बसत नाही आहे.