मुंबई - युनायटेड किंगडमची (UK) राणी म्हणुन सिंहासनावर ७० वर्षे गाजवणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय (queen elizabeth) यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्याशी संबंधित कथा, घटना आणि वादांवर बरेच काही लिहिले जात आहे. अशामध्येच राणी एलिझाबेथ यांचा जेम्स बॉन्ड सोबतचा एक व्हिडीओ बराच व्हायरल होत असल्याचे पाह्यला मिळते.
हा व्हिडिओ २०१२ साली झालेल्या (The London 2012 Summer Olympics)ऑलिम्पिक खेळ सोहळ्यातील आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात राणी एलिझाबेथ यांनी भन्नाट एन्ट्री केली होती. स्कायफॉल (skyfall Movie) या चित्रपटातील जेम्स बॉन्ड यांची भुमिका साकरलेला अभिनेता (Daniel Craig) डॅनियल क्रैग यांचा सोबत राणी एलिझाबेथ यांनी पॅराशूटच्या मदतीने अप्रतिम स्टंट करत कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
सध्या तोच व्हिडिओ एका ट्वीटर युजर्सने ट्वीट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर बराच व्हायरल होत आहे.. काय आहे तो व्हिडिओ पाहा
I think Queen Elizabeth had a great sense of humour and she was a good sport. She proved this when she made her grand entrance to the London 2012 Olympics alongside Daniel Craig as James Bond.
This was absolutely magnificent.
#RIPQueenElizabeth #QueenElizabeth #JamesBond pic.twitter.com/T9gKTcQzdU— The Sting (@TSting18) September 8, 2022
राणी एलिझाबेथ हेलिकॉप्टरमधून उडी मारून ऑलिम्पिक सोहळ्यात पोहोचल्या?
वयाच्या ८७ व्या वर्षी राणी एलिझाबेथ यांनी पॅराशूटच्या मदतीने अप्रतिम स्टंट केल्याचे स्टेडिएम मध्ये दाखवण्यात आले. लंडन स्टेडियममध्ये आणि जगभरातील टेलिव्हिजनवर सोहळा पाहणाऱ्या लोकांना एक व्हिडिओ दाखवण्यात आला होता. या व्हिडिओत राणी एलिझाबेथ या ब्रिटिश सिनेमातील पात्र जेम्स बाँड सोबत पाह्यला मिळतात.
जेम्स बाँड या पात्राची भुमिका साकरणारा ब्रिटीश अभिनेता डॅनियल क्रैग अनेक वर्षांपासून हे पात्र साकारत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला डॅनियल राणीला ऑलिम्पिक स्टेडियममध्ये घेऊन जाण्यासाठी बकिंगहॅम पॅलेसमध्ये जाताना दिसतात. तेथून दोघेही हेलिकॉप्टरमध्ये बसून स्टेडियमकडे रवाना झाल्याचे दिसते. या व्हिडिओत राणीचे दोन कोर्गी श्वान सुद्धा दिसतायत
यानंतर हेलिकॉप्टर रात्री स्टेडियमवर फिरताना पाह्यला मिळते. जेम्स बाँड हेलिकॉप्टरचे दार उघडतो आणि त्याचा स्वभावानुसार तो सावध नजरेने पाहतो आणि राणीला 'ऑल इज क्लीअर' चा इशारा देतो. असे करताच पॅराशूट परिधान केलेल्या राणी एलिझाबेथ हेलिकॉप्टरमधून उडी मारतात, जेम्सही त्यांच्या मागे उडी मारतो. त्यानंतर या व्हिडिओची क्लिप अचानक संपते आणि राणी एलिझाबेथ पाहुण्याच्या विंगेतून बाहेर पडताना दिसतात.
हे सर्व पाहून प्रेक्षक काही काळ स्तब्ध राहतात. खरतर बर्याच लोकांना हे माहित नाही की त्या रात्री लंडनच्या स्टेडियममध्ये दाखवलेला हा स्टंट राणी एलिझाबेथने नाही तर दुसऱ्या कोणीतरी साकरला होता.
या व्यक्तीने केला राणी एलिझाबेथचा ऑलिम्पिक स्टंट?
राणी एलिझाबेथच्या ऐवजी स्टंटमॅनने हा स्टंट केला होता. गॅरी कॉनरी नामक ब्रिटिश व्यक्ती स्कायडायव्हर आणि स्टंटमॅन आहे त्याने हा स्टंट केला होता. तर दुसरीकडे मार्क सटन या स्टंटमॅनने जेम्स बाँड म्हणजेच डॅनियल क्रैग यांचा स्टंट केला होता.