Viral Video : अवकाशातून एका इसमानं मारली काळजाचा ठोका चुकवणारी उडी आणि...

Viral Video : अवकाश आणि अवकाशाशी संलग्न विषयांबाबत कायमच अनेकांना कुतूहल वाटत असतं. याच अवकाशाविषयीच्या काही कमाल गोष्टी आजवर समोर आल्या आहेत.  

सायली पाटील | Updated: Aug 7, 2024, 01:41 PM IST
Viral Video : अवकाशातून एका इसमानं मारली काळजाचा ठोका चुकवणारी उडी आणि...
Viral Video of man jumps from space will shock you

Viral Video : भीतीला ज्यावेळी एखादी व्यक्ती सामोरी जाते तेव्हात ही भीती मागे पडून धाडसी वृत्ती समोर येते, असं अनेकजण म्हणतात. भीती नेमकी कशी दिसते? कशी असते? तुम्हाला माहितीये? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओच्या माध्यमातून ही भीती नेमकी कशी दिसते आणि त्यावर मात करणारी धाडसी वृत्ती कशी असते याचाही चेहरा दाखवला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अंतराळातून उडी मारली आणि... 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ आहे फेलिक्स बाउमगार्टनर नावाच्या एका लोकप्रिय स्कायडायव्हरचा. ज्यानं 2012 मध्ये चक्क अवकाशातून पृथ्वीच्या दिशेनं उडी मारली होती. 1 लाख 27 हजार 852 फूट इतक्या उंचीवरून त्यानं ही उडी मारली आणि तिथवर पोहोचण्यासाठी त्यानं हेलियम बलूनचा वापर केला होता. 

हेसुद्धा वाचा : बर्म्युडा ट्रँगलप्रमाणेच आहे अजून एक रहस्यमयी जागा; ज्या ठिकाणी होतात केवळ अपघात!

 

हेलियम बलूनमध्ये बसून फेलिक्स पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाऊन दुसऱ्या सर्वात खालच्या बाजूला असणाऱ्या थरापर्यंत पोहोतला, जिथं गुरुत्त्वाकर्षण कमी असून, जर तिथून कोणीही पृथ्वीच्या दिशेनं उडी मारली, तर ती व्यक्ती तरंगत नसून थेट पृथ्वीच्याच दिशेनं वेगानं येते. फेलिक्सनं तिथं खास पद्धतीच्या अंतराळवीरांचा सूट परिधान केला आणि तिथून त्यानं पृथ्वीच्या दिशेनं क्षणाचाही विलंब न लावता उडी घेतली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by L (@dimensionaloblivion)

अवकाशातून उडी मारण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये फेलिक्सनं आवाजाच्या गतीला कैक मैल मागे टाकलं आणि तो एका वर्तुळात अडकला. सुरुवातीला ही मोहिमच धोक्यात असलेलं वाटताना अखेर फेलिक्सनं पृथ्वीवर सुरक्षित लँड केलं आणि या मोहिमेकडे डोळे लावून बसलेल्या प्रत्येकानं सुटकेचा नि:श्वास सोडला. अवकाशातून पृथ्वीवर उडी मारणं हा एक थरारक अनुभव असल्याची प्रतिक्रिया या धाडसी व्यक्तीनं दिली आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More