मुंबई : जगभरात सध्या चर्चा आहे ती फक्त रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाची. एका लाईव्ह कार्यक्रमात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी युक्रेनमध्ये 'स्पेशल मिलिटरी ऑपरेशन' ची घोषणा केली आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. एकेकाळी सिक्रेट एजंट असलेले पुतीन यांच खासगी आयुष्य देखील खूप सिक्रेट आहे. पुतीन यांनी आपल्या मुली आणि संपूर्ण कुटुंब हे कायमच गुलदस्त्यात ठेवले.
पुतीन यांच्या खासगी आयुष्याचे अनेक किस्से समोर येत आहेत. आता ब्राझीलची मॉडेल आणि बमबम सूजी कॉर्टेजने नवं प्रकरणाला दुजोरा दिला आहे. सूजी आणि पुतीन यांची भेट 'वर्ल्ड कप इव्हेंट 2018' दरम्यान झाली. अशी माहिती 'डेली स्टार'ने दिली आहे.
सूजी म्हणाली, 'डिनर दरम्यान पुतीन यांनी माझा हात धरला आणि काही वेळ माझ्याकडे एकटक पाहात राहिले. पुतीन त्यांच्या सेक्रेटरीच्या माध्यमातून माझ्यासोबत संवाद साधत होते... '
'त्यानंतर मला सेक्रेटरीने सांगितलं की पुतीन यांनी मिस बमबम यांचं कौतुक केलं. एवढंच नाही तर त्यांनी रशियाला पुन्हा येण्यासाठी आमंत्रित केलं. मिस बमबमने सांगितलं की, मॉस्को फिरण्यासाठी मी टॅक्सीचा वापर करत होती...'
'पण पुतीन यांनी माझ्यासाठी सरकारी गाडी दिली. तेव्हा मला थोडं वेगळं वाटलं. मला कळत नव्हतं ते असं का करत आहेत. पुतीन माझ्यावर नजर तर ठेवत नाहीत ना? अशी शंका देखील माझ्या मनात आली....'
'तेव्हा मी ठरवलं आता रशियात पुन्हा येणार नाही. आता मी दाव्यानुसार म्हणू शकते तेव्हा मॉस्कोमध्ये मी घाबरली होती...' असं स्पष्टीकरण ब्राझिलची मॉडेल आणि बमबम सूजी कॉर्टेजने केलं.
काय आहे मीस बमबम?
मिस बमबम ही ब्राझीलची एक सौंदर्य स्पर्धा आहे, जी दरवर्षी आयोजित केली जाते. यामध्ये मॉडेल सुजी कॉर्टेजने विजेतेपद पटकावले आहे.