शेख हसीना भारतातच का आल्या? त्या पाकिस्तानला का गेल्या नाहीत?

Bangladesh PM Sheikh Hasina : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या हिंसाचाराची आग ढाका पॅलेसपर्यंत पोहोचलीय. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिलाय. त्यानंतर शेख हसीना या भारतात आश्रयसाठी आल्याची सूत्रांची माहितीय. 

नेहा चौधरी | Updated: Aug 5, 2024, 04:38 PM IST
शेख हसीना भारतातच का आल्या? त्या पाकिस्तानला का गेल्या नाहीत? title=
Why did bangladesh pm Sheikh Hasina come to India after resigning Why didnt they go to Pakistan

Bangladesh PM Sheikh Hasina : बांगलादेशात हिंसक (Bangladesh Violence) आंदोलनांची (Bangladesh Protest) आग दिवसेंदिवस वाढत असताना राजकीय भूकंप झाला. शेख हसीना (Sheikh Hasina ) यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. एवंढ नाही तर यानंतर ढाका पॅलेस सोडून शेख हसीना आणि त्यांची बहीण भारताच्या दिशेने रवाना झाल्या आहेत, अशी सूत्रांनी माहिती दिलीय. या घटनेनंतर बांगलादेशाचा ताबा लष्कराने घेतलाय. या घटनेनंतर अनेकांना हा प्रश्न पडलाय की, शेख हसीना पाकिस्तानला का आल्या नाहीत? (Why did bangladesh pm Sheikh Hasina come to India after resigning Why didnt they go to Pakistan)

त्या पाकिस्तानला का गेल्या नाहीत?

बांगलादेश हा 1971 पूर्वी पूर्व पाकिस्तानचा एक प्रांत होता. असं असताना आज जेव्हा बांगलादेशमध्ये हिंसाचार पेटला त्यानंतर पंतप्रधान शेख हसीना या पाकिस्तानला का गेल्या नाहीत. त्या भारताच का आल्या? यामागे 1971 मधील मुक्ती संग्राम म्हणजे बांगलादेशाचं स्वातंत्र्ययुद्धची पार्श्वभूमी आहे. 

हेसुद्धा वाचा - Bangladesh Violence: शेख हसीना देश सोडून पळून जाताच लष्कराने हाती घेतली सत्ता; लष्कर प्रमुख म्हणाले 'आता आम्ही..'

25 मार्च ते 16 डिसेंबर 1971 पर्यंत या रक्तरंजित युद्धातून बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळालं. हे युद्ध अनेक कारणाने ऐतिहासिक ठरलं होतं. भारतासमोर 93 हजार पाकिस्तानी सैनिकांनी गुडघे टेकले होते. पाकिस्तानी लष्कराचे अत्याचाराविरोधात पूर्व पाकिस्तानातील जनता म्हणजे आजच बांगलादेश रस्त्यावर उतरली होती. यात लाखो लोक मारले गेले होते. एवढंच नाही तर असंख्य स्त्रियांची प्रतिष्ठा लुटली गेली होती. यावेळी शेजारी असलेल्या भारताने या दडपशाहीला विरोध करण्यासाठी पाकिस्तानविरोधात युद्ध पुकारले. भारतासमोर पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडलं. त्यातून दक्षिण आशियामध्ये एक नवीन देश उदयास आला तो म्हणजे बांगलादेश. 

हेसुद्धा वाचा - आरक्षणामुळे पेटतोय बांगलादेश! PM देश सोडून पळाल्या; अराजकतेचं नेमकं कारण काय?

25 मार्च 1971 ला सुरू झालेल्या ऑपरेशन सर्च लाइटपासून ते संपूर्ण बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यापर्यंत पूर्व पाकिस्तानमध्ये खूप हिंसाचार माजला होता. बांगलादेश सरकारच्या म्हणण्यानुसार, या काळात सुमारे 3 दशलक्ष लोकांचा बळी गेला होता. अजून एक महत्त्वाच कारण म्हणजे 26 मार्च 1971 ला पाकिस्तानच्या सैनिकांनी शेख मुजीबुर रहमान यांना अटक केली होती. त्यामुळे बांगलादेशच्या नेत्यांना पाकिस्तानी मिलिट्रीवर विश्वास नाही, असं म्हणता येईल. त्यामुळेच शेख हसिना यांनी पाकिस्तानमध्ये न जाता भारतात येण्याचा निर्णय घेतला असावा, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान पाकिस्तानमधील अनेक नेत्यामध्ये आणि लोकांमध्ये आजही बांगलादेश विरोधात नाराजी आहे. अशा स्थितीत शेख हसीना या आश्रयासाठी पाकिस्तान जाणे धोकादायक होतं, असं तज्ज्ञ सांगतात.