टेस्ट सीरीजमध्ये विराट-पुजारासोबत टीम इंडियाच्या या फलंदाजांकडून अपेक्षा

इंग्लंडमध्ये एशेज आणि श्रीलंकामध्ये न्यूझीलंडच्या टेस्ट सीरीजनंतर भारत आणि वेस्टइंडिजमध्ये दोन टेस्ट मॅचच्या सीरीजचा पहिला सामना एंटिगुआमध्ये गुरूवारपासून खेळला जाणार आहे.

Updated: Aug 21, 2019, 04:56 PM IST
टेस्ट सीरीजमध्ये विराट-पुजारासोबत टीम इंडियाच्या या फलंदाजांकडून अपेक्षा title=

मुंबई : वर्ल्डकपनंतर आता सगळ्यांचे आईसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपकडे लक्ष लागून आहे. इंग्लंडमध्ये एशेज आणि श्रीलंकामध्ये न्यूझीलंडच्या टेस्ट सीरीजनंतर भारत आणि वेस्टइंडिजमध्ये दोन टेस्ट मॅचच्या सीरीजचा पहिला सामना एंटिगुआमध्ये गुरूवारपासून खेळला जाणार आहे. सीरीजमध्ये सगळ्यांचे लक्ष काही खेळाडूंवर असेल.

विराट कोहलीचा फॉर्म
विराटने वनडे सीरीजमध्ये दोन शतक केल्यानंतर टेस्टमध्ये पुन्हा एकदा मोठा डाव खेळण्यासाठी तयार आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या विरोधात चार टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये ४०.२८ च्या सरासरीने २८२ रन बनवले. ज्यात एक शतक आणि एक हाफ सेंचुरी आहे. या सीरीजच्या शेवटच्या डावात विराटने २३ रन बनवले. विराटची टेस्टमध्ये मोठा डाव खेळण्याची इच्छा सगळ्यांना माहित आहे.

पुजारा शतक करण्याच्या मूडमध्ये
चेतेश्वर पुजाराने त्याच्या ६८ सामन्यांच्या करियरमध्ये ५ हजार ४२६ रन बनवले. त्यात १८ शकत आणि २० हाफ सेंचुरी त्याच्या नावावर आहेत. पुजारा टेस्ट खेळाडू असून तो नेहमी मोठा डाव खेळतो. वेस्टइंडीमध्ये त्याने दोन टेस्टमॅच खेळल्या. ज्यात दोन डावात त्याने फक्त ६२  रन केले. पुजारा फक्त न्यूझीलंड आणि वेस्टइंडीजमध्ये शतक करू शकला नाही. अभ्यास सामन्यात शतक करत त्याने आपला फॉर्म सगळ्यांना दाखवून दिला.

रहाणेकडून रेकॉर्ड चांगला करण्याच प्रयत्न 
रहाणेचा ओवरसीज रेकॉर्ड चांगला आहे. २२ स्वदेशी आणि ३४ परदेशात टेस्ट खेळणाऱ्या रहाणेची सरासरी  ३४.५४ आणि ४४.३० आहे. वेस्टइंडीजमध्ये रहाणेने चार सामन्यात एक नाबाद शतक केले आहे. परंतू गेल्यावर्षी त्याची सरासरी ३० च्या जवळपास होती. तर आता त्याच्याकडून देखील टीमच्या अपेक्षा आहेत. 

केएल राहूल पुन्हा उत्कृष्ठ  खेळ दाखवणार
केएल राहूलने आतापर्यंत ३४ टेस्ट मॅच खेळल्या आहेत. त्यात त्याने ३५ च्या सरासरीत १ हजार ९०५ रन केले आहेत. यात ५ शतक आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. २०१८ च्या ६ सामन्यात त्याची सरासरी ३२.०९ होती. त्यात तो एक शतक करू शकला. वेस्टइंडीजमध्ये तीन टेस्टच्या तीन डावांमध्ये त्याने एक शतक आणि एक अर्धशतक करत २३६ रन केले. केएलकडे त्याची कंसिस्टंसी दाखवण्याची सूवर्ण संधी आहे.

ऋषभ पंत खेळेल मोठा डाव
पंतने फक्त इंग्लंडमध्ये चांगली फलंदाजी करून टेस्टमध्ये शतक केलं होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियात देखील त्याने १५९ रन बनवले होते. वेस्टइंडीजच्या विरोधात त्याने ९२ रन केले आहेत. परंतू गेल्या काही काळापासून वनडे आणि टी२० फॉर्मेटमध्ये त्याने चांगले प्रदर्शन केले नाही. 
 
विहारी आणि मयंक संधीच्या शोधात
विहारीने चार टेस्ट खेळत एक शतक केले आहे. त्याशिवाय मयंकचा दोन टेस्टमध्ये ६५ ची सरासरी आहे. त्याच्याकडून देखील टीमची अपेक्षा आहे.