झहीर सागरिकाच्या लग्नात विराट-अनुष्काचे ठुमके...

भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे २३ नोव्हेंबरला विवाहबद्ध झाले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 28, 2017, 03:07 PM IST
 झहीर सागरिकाच्या लग्नात विराट-अनुष्काचे ठुमके... title=

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे २३ नोव्हेंबरला विवाहबद्ध झाले. त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला असला तरी २७ नोव्हेंबरला मुंबईच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये ग्रॅड रिसेप्शनचे आयोजन केले होते. रिसेप्शनला क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते. 

सुष्मिता सेन, सुरेश रैना, सचिन तेंडूलकर, युवराज सिंग यांसारख्या अनेक खेळाडूंनी आणि स्टार्सने नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या. 

मात्र विराट आणि अनुष्काचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. विराट आणि अनुष्काने रिसेप्शनला एकत्र हजेरी लावली. 

 

Virushka Dance Video  Repost with credits!!  #virushka

A post shared by @virat_kohli_fans_only on

रिसेप्शनला विराटने ग्रे रंगाचा सूट आणि अनुष्काने काळ्या रंगाचा लेहंगा परीधान केला होता. या लूकमध्ये दोघे अतिशय सुंदर दिसत होते. त्याचबरोबर विराट आणि अनुष्काने जबरदस्त डान्स केला. झहीर आणि सागरिका देखील ठुमके लावले. या सर्वांना युवराज सिंग आणि हेजल कीच यांनीही साथ दिली. 

काही दिवसांपूर्वी विराटने झहीर खान आपला लव्ह गुरू असल्याचे सांगितले होते.