... आणि म्हणून आमीर खानने थांबवलं सिनेमाचं शूटिंग

बॉलिवूड अभिनेता आमीर खानने आपल्या ट्विटरवर एक ट्विट करत आगामी सिनेमाचं शूटिंग काही काळ बंद करत असल्याचं म्हटलं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 2, 2017, 06:50 PM IST
... आणि म्हणून आमीर खानने थांबवलं सिनेमाचं शूटिंग  title=
File Photo

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता आमीर खानने आपल्या ट्विटरवर एक ट्विट करत आगामी सिनेमाचं शूटिंग काही काळ बंद करत असल्याचं म्हटलं आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर आमीर खानच्या प्रोडक्शनचा 'सीक्रेट सुपरस्टार' हा सिनेमा रिलीज होणार आहे.  आमीर खान या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बीझी असणार आहे. त्यामुळे आमीर आपल्या आगामी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमाचं शूटिंगसाठी वेळ देऊ शकत नाहीये.

आमीर खानला आपल्या प्रोडक्शनच्या प्रमोशनमध्ये कुठलीच कमी ठेऊ इच्छित नाहीये आणि त्यामुळेच त्याने 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमाचं शूटिंग काही काळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

'सीक्रेट सुपरस्टार' या सिनेमात 'दंगल' सिनेमात आमीर खानसोबत काम केलेली अभिनेत्री जायरा वसीम मुख्य भूमिकेत असणार आहे. या सिनेमाची कहाणी एका तरुणीवर आहे जी सिंगर बनू इच्छिते मात्र, तिच्या वडिलांचा त्याला विरोध असल्याचं दाखविण्यात आलं आहे.

हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच १९ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.