नीना गुप्ता यांना मुलीचा सांभाळ कारण्यासाठी करावं लागलं 'हे' काम

नीना यांना त्यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यात देखील अनेक संकटांना सामोरं जावं लागलं  

Updated: Apr 30, 2021, 05:44 PM IST
नीना गुप्ता यांना मुलीचा सांभाळ कारण्यासाठी करावं लागलं 'हे' काम

मुंबई :  बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक कलाकाराला घाम गाळावा लागला. काहींच्या नशिबात यश लवकर लिहिलेलं असतं, तर काहींना मात्र सतत खस्ता खावा लागतो. असचं काही घडलयं अभिनेत्री नीना गुप्ता यांच्यासोबत. नीना यांना त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यात देखील अनेक संकटांना सामोरं जावं लागलं, पण त्यांचं खासगी आयुष्य देखील दुःखांनी भरलेलं होतं. त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या होत्या. 

नीना यांना एक मुलगी आहे. तिचं नाव मसाबा. मसाबाचं पालकत्व एकट्या नीना यांच्याकडे होतं. प्रोफेशनल आयुष्यात अडचणी त्यात मुलीचं पालकत्व त्यामुळे त्यांना काम करणं गरजेचं होतं. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. महत्त्वाचं  म्हणजे त्यांनी याठिकाणी स्वतःचा अनुभव  सांगितला आहे. 

नीना म्हणाल्या, 'मसाबाासाठी  मला काम करणं गरजेचं होतं. ज्या कामांमध्ये मला आनंद मिळत नव्हाता अशी कामं देखील मला करावी लागली. पण आता दिवस बदलले आहेत. आता मी लग्न केले आहे. त्यामुळे फक्त पैश्यांसाठी मला कोणतही काम करावं लागत नाही.'

त्या पुढे म्हणाल्या, 'मला आता मसाबा काम करण्यासाठी प्रोत्साहित करते, आता ती माझी आई झाली आहे. आता मी माझ्या कुटुंबासोबत आनंदी आहे.' असं देखील नीना म्हणाल्या.  या आव्हानांनी खचून न जाता त्यांनी मोठ्या धीराने चित्रपटसृष्टीक स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापित केली.  

नीना गुप्ता आता लवकरचं 'सरदार का ग्रँडसन' मध्ये दिसणार आहेत. चित्रपटात अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री रकुल प्रित सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यानंतर नीना  ग्वालियर (Gwalior) चित्रपटाच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शिवाय आगामी '83'  चित्रपटात नानी अभिनेता रणवीर कपूरच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत.