Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : हक्काचं निमंत्रण; रणबीर- आलियाच्या लग्नाआधी व्हायरल होतेय ‘ही’ पत्रिका

चाहत्यांचा उत्साह शिगेला

Updated: Apr 7, 2022, 04:14 PM IST
Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : हक्काचं निमंत्रण; रणबीर- आलियाच्या लग्नाआधी व्हायरल होतेय ‘ही’ पत्रिका  title=

मुंबई : कपूर कुटुंबात म्हणे सध्या लगबग सुरु आहे ती म्हणजे नव्या सुनेच्या प्रवेशाची. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर ही जोडी आता त्यांच्या नात्याला लग्नाचं नाव देण्यास सज्ज झाली आहे. एका नव्या प्रवासाची सुरुवात करण्याआधीपासूनच चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. (Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding)

‘रणलिया’चं लग्न कुठे होणार, लग्नाला ही जोडी कशी दिसेल, या लग्नात कोण कोण येणार हे सर्वच प्रश्न आणि त्यांची उत्तरं सध्या नजरा वळवत आहेत.

त्यातच आता एक लग्नपत्रिका समोर आली आहे. पत्रिकेचा फोटो सध्या कमाल व्हायरल होत आहे. जो पाहून हयात नसलेल्या रणबीरच्या वडिलांचा म्हणजेच ऋषी कपूर यांचाही आशीर्वाद या जोडीला मिळत असल्याचं कळत आहे.

कारण, हा व्हायरल होणारा फोटो रणबीर आणि आलियाच्या लग्नपत्रिकेचा नसून, कपूर कुटुंबातीलच एका खास लग्नसोहळ्याच्या पत्रिकेचा आहे. ही लग्नपत्रिका आहे, रणबीरचे बाबा ऋषी कपूर आणि आई, नीतू कपूर यांच्या लग्नाची.

कपूर कुटुंबाकडून हक्काचं बोलवणं असणाऱ्या या पत्रिकेतून एक काळ, कुटुंबाचे बंध आणि अर्थातच कपूर कुटुंबाच्या आठवणी झळकत आहेत.

दरम्यान, अद्यापही रणबीर आणि आलियाच्य लग्नाची पत्रिका समोर आलेली नाही. पण, सूत्रांच्या माहितीनुसार ही जोडी चेंबूर येथील आरके हाऊस येथेच विवाहबंधनात अडकेल.

कौतुकाची बाब म्हणजे नीतू आणि ऋषी यांचीही लग्नगाठ इथंच बांधली गेली होती. त्यामुळं काही गोष्टींची इथं पुन्हा पुनरावृत्ती होणार यात शंका नाही.