आलिया भट्टचं लग्नाबाबत मोठं वक्तव्य

पुन्हा एकदा आलिया आणि रणबीरच्या नावाची चर्चा 

Updated: Feb 19, 2020, 11:55 AM IST
आलिया भट्टचं लग्नाबाबत मोठं वक्तव्य title=

मुंबई : बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सध्या या दोघांच्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा रंगली आहे. प्रत्येक आठवड्यात या दोघांच्या लग्नांच्या चर्चा रंगतात. मात्र, अद्याप या दोघांच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही. 

पहिल्यांदाच आलियाने आपल्या लग्नाबद्दल मौन सोडलं आहे. आलियाने एका वाहिनीला मुलाखत देताना सांगितले की, लग्नाच्या चर्चा या काही एंटरटेनमेंटशिवाय काही कमी नाही. या चर्चा तिच्यासाठी फक्त एंटरटेनमेंट सोर्स आहेत. 

दरदिवशी लग्नाशीसंबंधीत अफवा समोर येत असतात. या सगळ्या गोष्टींना आलियाने नाकारलं आहे. अशी चर्चा होती की, आलिया-रणबीर कपूरचं लग्न हे शाही लग्न होणार आहे. भट्ट कुटुंबियांनी कपूर कुटुंबियांना आमंत्रण पाठवलं आहे. या सगळ्या अफवा असल्याचं आलियाने सांगितलं. 

काही दिवसांपूर्वीच ऋषी कपूर आणि नीतून कपूर यांनी लग्नाची तयारी सुरू केल्याची चर्चा रंगली होती. लग्नाची तयारी कृष्णाराज प्रॉपर्टीमध्ये होणार असून याकरता रेनोवेशनचं काम देखील करायला घेतलं आहे. 

कृष्णाराज प्रॉपर्टीच रिनोवेशनच काम झाल्यावर रणबीर आणि आलियाच्या लग्नाची तयारी सुरू करणार आहेत. तसेच अशी देखील चर्चा रंगली आहे की, प्री-वेडिंग आणि पोस्ट वेडिंगची पूजा देखील केली आहे. यावरून स्पष्ट होतं की, नीतू आध्यात्मिक आहेत. त्यांच्या मुलाचं लग्न अतिशय पारंपरिक व्हावं असं त्यांना वाटतं.