आलिया, रणवीरकडून Nora Fatehi ला टक्कर, VIDEO चा इंटरनेटवर धुमाकूळ

व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Updated: Dec 1, 2021, 10:06 AM IST
आलिया, रणवीरकडून Nora Fatehi ला टक्कर, VIDEO चा इंटरनेटवर धुमाकूळ

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, रणवीर सिंग, नोरा फतेही, क्रिती सेनन यांनी अलीकडेच दिल्लीत एका लग्नात परफॉर्म केलं. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहते याचे क्लिप इंस्टाग्रामवर शेअर करत आहेत.

या व्हिडिओंमध्ये आपण पाहू शकतो की रणवीर सिंगने 'खली-बली', 'आंख मारे'वर लोकांना डान्स करण्यास भाग पाडले. या लग्नात आलिया भट्टने निळ्या रंगाचा कर्ल ड्रेस परिधान करून 'तम्मा तम्मा' आणि 'कर गई चुल'वर डान्स केला. या दोघांनी 'गली बॉय' चित्रपटात एकत्र धमाल केली आहे. या लग्नातही दोघांनी जमवून लुटले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

या लग्नात कियारा अडवाणी आणि क्रिती सेनन देखील त्यांच्या सेक्सी मूव्ह्सने स्टेजवर उत्तम परफॉर्म करत आहेत. या सगळ्यासह बॉलिवूडची सर्वात पॉवरफुल डान्सर नोरा फतेहीने तिच्या 'साकी-साकी' या सुपरहिट गाण्यावर डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आलिया आणि रणवीर करण जोहरच्या आगामी रॉकी आणि रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात जया बच्चन आणि धर्मेंद्र यांच्यासोबत दिग्गज कलाकार दिसणार आहेत.