Allu Arjun नं दिला होता Shah Rukh Khan च्या 'जवान'ला नकार!

Allu Arjun नं गेल्या काही दिवसांपासून पुष्पा चित्रपटामुळे चर्चेत होता. दरम्यान, आता तो बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) चित्रपटाला नकार दिल्याच्या बातमीमुळे चर्चेत आला आहे. अल्लू अर्जुननं नकार दिल्यानंतर त्या चित्रपचटात आता कोण दिसणार? 

Updated: Mar 2, 2023, 03:49 PM IST
Allu Arjun नं दिला होता Shah Rukh Khan च्या 'जवान'ला नकार! title=

Allu Arjun Rejected Shah Rukh Khan's Jawan Movie : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अल्लू अर्जुन त्याच्या पुष्पा या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर अल्लू अर्जुनला अनेक चित्रपटांची ऑफर मिळाली होती. त्या लिस्टमध्ये असलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आगामी चित्रपट 'जवान' (Jawan). तुम्हाला वाचून धक्काबसला ना... मात्र, हे सत्य आहे. शाहरुख आधी या चित्रपटाची ऑफर अल्लू अर्जुनला देण्यात आली होती. मात्र, त्यानं या चित्रपटाला नकार दिला होता. ही माहिती समोर येताच सगळ्यांना प्रश्न पडला आहे की अल्लू अर्जुननं चित्रपटाला का नकार दिला? 

रिपोर्ट्सनुसार, जवान या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटली करत आहे. या चित्रपटासाठी त्यांची पहिली पसंत अल्लू अर्जुन होता. मात्र, अल्लू अर्जुननं नकार दिला. इतकंच काय तर निर्माते आणि अल्लु अर्जून आधी भेटले होते आणि त्यावेळी चित्रपटाचे नरेशनही करण्यात आले होते. पटकथा ऐकल्यानंतर अल्लू अर्जुननं चित्रपटाला नकार दिला. 

अल्लू अर्जुननं चित्रपट नकारण्याची कारणं

रिपोर्ट्सनुसार, अशी माहिती समोर आली आहे की अल्लू अर्जुननं 'जवान' चित्रपटासाठी नकार देण्याची अनेक कारणं आहेत. यात 'पुष्पा 2' असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटासाठी अल्लू अर्जुन स्पेशल ट्रेनिंग घेत आहे. त्यामुळेच त्याच्याकडे इतर प्रोजेक्ट्स घेण्यासाठी वेळ नाही. दुसरं कारणं म्हणजे विजाग आणि हैद्राबादमध्ये 'पुष्पा 2' चं शुटिंग सुरु आहे. तर अशीही माहिती समोर आली आहे की अल्लू अर्जुनला 'जवान' या चित्रपटाच एका छोट्या भूमिकेची ऑफर दिली होती. त्यावर त्यानं बराचकाळ विचारही केला, पण त्यानं चित्रपटाला नकार दिला. त्यामागचं कारण म्हणजे त्याला 'पुष्पा 2' करायचा होता आणि त्याच्याकडे वेळ नव्हता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Viral Video : हाच खरा HERO ! भररस्त्यात गर्लफ्रेंडला मारहाण करणाऱ्या बॉयफ्रेंडला अभिनेत्यानं शिकवला असा धडा...

'पुष्पा 2' विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात अल्लू अर्जुन व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आणि फहाद फासिल (Fahadh Faasil) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याव्यतिरिक्त चित्रपटात सगळ्यांची लाडकी अभिनेत्री साई पल्लवी देखील दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, या बातमीवर अजून कोणी दुजोरा दिलेला नाही. तर जवान हा चित्रपट 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. तर अजून त्याची शुटिंग सुरु आहे.