close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जेव्हा अमृता म्हणाली होती, तो पाकिस्तानी क्रिकेटर 'माझा आणि माझ्यासाठीच...'

पाकिस्तानी क्रिकेटरसोबत अमृता रिलेशनशिपमध्ये होती.

Updated: Jun 12, 2019, 05:50 PM IST
जेव्हा अमृता म्हणाली होती, तो पाकिस्तानी क्रिकेटर 'माझा आणि माझ्यासाठीच...'

मुंबई : बॉलिवूड आणि क्रिकेटचं नेहमीच खास नातं राहिलं आहे. आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेटपटूंनी लग्न केलं आहे. सध्या सर्वत्र क्रिकेट विश्वचषकाची चर्चा पाहायला मिळते आहे. सध्या अशाच एका अभिनेत्री अमृता अरोरा आणि क्रिकेटरची चर्चा आहे. बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरा अनेकदा तिच्या फिटनेसमुळे, सोशल मीडियातील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. परंतु आता मात्र अमृता तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. लग्नाआधी अमृता मूळचा पाकिस्तानी असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला डेट करत असल्यामुळे चर्चेत होती. अमृता तिचा पती शकील लडकशी लग्न करण्याआधी ऑस्ट्रेलियन खेळाडू उस्मान अफजलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 

अमृताने शकील लडकशी लग्न केलं आहे. परंतु लग्नाआधी अमृता उस्मान अफजलला डेट करत होती. दोघेही अनेकदा एकत्र फिरताना पाहायला मिळायचे. २००७-०८ मध्ये या दोघांच्या नात्याची मोठी चर्चा होती. २००७ मध्ये अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान 'कौन बनेगा करोडपती'च्या शोमध्ये पोहचले होते. त्यावेळी या दोघांसोबत अमृता अरोरा आणि उस्मान अफजलही आले होते. 

या शोदरम्यान अमृताने 'मला असं वाटतं की त्याचं असणं हे मुळात माझ्यासाठीच आहे. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही या नात्याचा कायदेशीररित्या स्वीकार करु.' असं तिने म्हटलं होतं. 

परंतु ४ वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. २००८ मध्ये उस्मान अफजलपासून वेगळं झाल्यानंतर अमृताने शकील लडक याला डेट करण्यास सुरुवात झाली. जवळपास ६ महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर ४ मार्च २००९ मध्ये अमृता आणि शकीलने लग्न केलं. 

शकील लडक अमृता अरोराची मैत्रीण निशा रानाचा पती होता. काही रिपोर्टनुसार, अमृतामुळे शकील आणि निशाचा घटस्फोट झाल्याचं बोललं जात होतं. शकील आणि निशा २००६ मध्ये वेगळे झाले. त्यानंतर अमृता आणि शकील २००८ मध्ये रिलेशनशिपमध्ये आले होते. २००९ मध्ये अमृता आणि शकीलने लग्न केलं.