Anurag Kashyap च्या मुलीचे प्रायव्हेट फोटो; बॉयफ्रेन्डसोबत झाली इंटीमेट

अनुराग कश्यपची मुलगी कायम तिच्या खासगी आयुष्याबद्दल उघडपणे बोलत असते.

Updated: Aug 25, 2021, 10:53 AM IST
Anurag Kashyap च्या  मुलीचे प्रायव्हेट फोटो; बॉयफ्रेन्डसोबत झाली इंटीमेट

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि त्याची मुलगी आलिया कश्यप यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. स्टार किड्सच्या चर्चीत मुलांपैकी एक अनुरागची मुगली आहे. अनुरागची मुलगी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. शिवाय ती स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दलही उघडपणे सोशल मीडियावर बोलत असते. आता आलियाचे बॉयफ्रेन्डसोबत असलेले काही प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

Anurag Kashyap Daughter Aaliyah Kashyap Private Pictures

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये ती बॉयफ्रेन्डसोबत रोमॉन्टीक अंदाजात दिसत आहे. आलियाच्या बॉयफ्रेन्डचं नाव शेन ग्रेगोयर असं आहे. काही फोटोंमध्ये आलिय बॉयफ्रेन्डसोबत लिपलॉक करताना दिसत आहे. 

Anurag Kashyap Daughter Aaliyah Kashyap Private Pictures

आलियाने बॉयफ्रेन्डच्या वाढदिवसादिवशी बॉयफ्रेन्डसोबत फोटो शेअर केले. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आलियाने तिच्या प्रियकरासोबत एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'माझा नंबर वन' असे लिहिले होते.

Anurag Kashyap Daughter Aaliyah Kashyap Private Pictures

बॉयफ्रेन्डला शुभेच्छा देत आलिया म्हणाली, '22 व्या वर्षात पदार्पण केल्यामुळे शुभेच्छा... जगातील सर्वात भाग्यशाली मुलगी असल्याचा मला अनुभव करून दिल्यामुळे तुझे आभार... माय लव्ह...'