या कारणामुळे सलमान ऑनस्क्रीन KISS करत नाही?

अरबाज खानने केला खुलासा 

या कारणामुळे सलमान ऑनस्क्रीन KISS करत नाही? title=

मुंबई : अभिनेता सलमान खान फक्त त्याच्या सिनेमामुळेच नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत राहत असतो. मग ते त्याचं लग्न असो किंवा ऑनस्क्रीन  हॉट सीन असो? सध्या सलमान खान अशाच एका विषयामुळे चर्चेत आला आहे. 

सलमान खान ऑनस्क्रीन किस का करत नाही? या महत्वाच्या प्रश्नाचा खुलासा सलमान खानचा भाऊ अरबाज खानने केला आहे. 

कॉमेडीयन कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो' मध्ये याचा खुलासा झाला आहे. या शोमध्ये सलमान खान त्याच्या दोन्ही भावांसोबत म्हणजे अरबाज आणि सोहेलसोबत आला होता. 

हा एपिसोड अजून टेलिकास्ट झालेला नाही पण याच्या प्रोमो व्हिडिओतून ही गोष्ट समोर आली आहे. अरबाजने सगळ्या मोठं सिक्रेट रिव्हील केलं आहे. 

या शोमध्ये कपिल शर्मा सलमानला विचारतो की,'जर तुझा पहिला सिनेमा असेल आणि त्या अभिनेत्रीला भेटले देखील नसाल तर, तुम्ही कंफर्टेबल फील कराल का?' कारण आपण अनोळखी व्यक्तीसोबत जास्त मोकळेपणाने बोलू शकत नाही. 

याचं उत्तर देताना सलमान म्हणतो की, किस तर मी करत नाही त्यामुळे एवढा काही फर्क पडत नाही. याचवेळी अरबाज खान सलमान खानची मस्करी करताना दिसतो. 

अरबाज खान हसत म्हणतो की, 'ऑफस्क्रीन एवढं करतो की, ऑनस्क्रीन करण्याची गरजच पडत नाही'. यानंतर सगळेच जण हसायला लागतात. 

तसेच सोहेल खान यावेळी त्याला बँडस्टँडला मारहाण झाल्याचा किस्सा सांगतो. आणि त्यावेळी भाईजान सलमान खानने आपल्याला कशी मदत केली याचा देखील तो खुलासा करतो. 

कपिल शर्माने 29 डिसेंबर रोजी  पुन्हा एकदा टीव्हीवर वापसी केली आहे. त्याचा शोचा फॉर्मेट पहिल्यासारखाच आहे. शोच्या पहिल्याच आठवड्यात सेलिब्रिटी गेस्ट म्हणून सारा अली खान, रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी आले होतं.