Arjun Kapoor Liplock : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या कामापेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. पण यावेळी अर्जुन कपूर त्याच्या कामामुळे चर्चेत आला आहे. 'द लेडी किलर' हा त्याचा आगामी चित्रपट आहे. तर त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले असून त्यासोबत त्याच्या कामाची स्तुती केली आहे. इतकंच नाही तर काही नेटकऱ्यांनी त्याला मलायकाची आठवण करून दिली आहे.
खरंतर अर्जुन कपूरच्या करिअरसाठी The Lady Killer हा एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. त्याच्या 'द लेडी किलर' या चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेकांनी हिच आशा व्यक्त केली आहे. हा त्याचा सगळ्यात चांगला चित्रपट असू शकतो. या ट्रेलरमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, जे पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले. अनेक गोष्टी अशा सस्पेन्सनं भरलेल्या आहेत की पुढे काय होणार या गोष्टीचा तुम्ही विचार करत रहाल. खूप गुंथागुंधीच्या गोष्ट आहे.
हेही वाचा : 'आमच्याकडून टिप्स घेऊ नका...', सलमानच्या भावांनी उडवली त्यांच्याच लग्नाची खिल्ली
'द लेडी किलर' या चित्रपटात अर्जुन कपूर हा प्ले बॉयची भूमिका साकारत आहे. अर्जुन कपूरच्या आयुष्या एक मुलगी असून तिला तो कमिटेड असतो. तरी देखील तो दुसऱ्या मुलीच्या म्हजेच भूमि पेडनेकरच्या प्रेमात पडतो. पण ती सर्वसाधारण मुलगी नसते, ती कोण आहे त्याची एक वेगळीच कहानी आहे ज्याविषयी कोणाला काही माहित नाही, थोडक्यात ती एक मिस्ट्री आहे. त्याविषयी अर्जुनला थोडी देखील कल्पना नसते. अखेर तिच्याविषयीच सत्य जेव्हा अर्जुनच्या समोर येतं तेव्हा त्याला मोठा धक्का बसतो. ज्या मुलीवर अर्जुन प्रेम करतो तिचं महाराजासोबत अनैतिक संबंध आहेत हे अर्जुनला कळतं. या सगळ्या लव्ह मिस्ट्रीक एक मर्डर होतो. जो संपूर्ण गोष्टीला इंटेस बनवतो.
'द लेडी किलर' चं दिग्दर्शन अजय बहल यांनी केलं आहे. हा चित्रपट 3 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अर्जुनच्या या चित्रपटाच्या ट्रेलरला पाहून नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत की 'हाफ गर्लफ्रेंड' नंतर अर्जुननं केलेल्या अभिनयानं प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी कमेंट करत मलायकाची आठवण काढली आहे. एक नेटकऱ्यानं म्हटलं की 'अर्जुनचे हे किसिंग सीन जर मलायकानं पाहिले तर ती नक्कीच चिडेल.' तर दुसरा नेटकरी म्हणाला, 'मलायका वहिनी मारेल'.
|
IND
(20 ov) 253/7
|
VS |
ENG
246/7(20 ov)
|
| India beat England by 7 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 169/8
|
VS |
NZ
173/1(12.5 ov)
|
| New Zealand beat South Africa by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
WI
(20 ov) 195/4
|
VS |
IND
199/5(19.2 ov)
|
| India beat West Indies by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.