मुंबई : अमिताभ बच्चन त्यांच्या 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये स्पर्धकांसोबत गेम खेळताना अनेकदा खूप मजा करतात. अनेकवेळा ते स्पर्धकांशी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही बोलतात आणि काही वेळा ते त्यांच्या पर्सनल गोष्टीही शेअर करतात. आता अलीकडेच बिग बींनी त्यांच्या शालेय जीवनातील अनुभव शेअर केला आहे. स्पर्धक साहिल शिंदे या शोमध्ये आला होता. जो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे.
साहिलशी बोलताना बिग बी त्यांच्या शालेय दिवसांबद्दल बोलतात आणि त्या दिवसातील त्यांच्या क्रशबद्दलही सांगतात. बिग बींनी सांगितलं की, जेव्हा ते शाळेत होते तेव्हा ते हॉस्टेलमध्ये राहत असत. त्यावेळी त्यांना बहिणीच्या शाळेत शिकणारी मुलगी आवडली होती. त्यामुळे ते तिथे कायम जायचे. बिग बी म्हणाले, 'माझ्या बहिणीची शाळा जवळच्या भागात होती आणि मला तिथली एक मुलगी आवडायची.'
बिग बी पुढे म्हणाले की, त्यांना ती इतकी आवडली होती की, ते तिला भेटण्यासाठी खूप मोठी दरी पार करत असत. त्यानंतर बिग बींनी साहिलला विचारलं की, त्याला कोणी आवडते की नाही यावर त्याने नकार दिला. पण नंतर जेव्हा साहिलचा व्हिडिओ सुरू होतो तेव्हा तो सत्य सांगतो. साहिलचा मित्र बिग बींना सांगतो की, त्याला त्याच्या शालेय दिवसांपासून एक मुलगी आवडते.
त्यानंतर बिग बी म्हणाले की तुम्ही शोमध्ये खोटे बोलू शकत नाही आणि आता आम्हाला कळलं आहे की, तुम्हाला कोणीतरी आवडतं. आता आम्हाला तिच्याबद्दल सांगा. यानंतर प्रोमो तिथेच संपतो.
बिग बींच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर ते शेवटचे गुड बाय या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत रश्मिका मंदान्ना, नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होत्या. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. त्याचबरोबर ते उंचाई या चित्रपटातही दिसणार आहेत. या चित्रपटात बिग बींसोबत अनुपम खेर, बोमन इराणी, परिणीती चोप्रा प्रमुख भूमिकेत आहेत.