ती पुन्हा आलीये.... काहीही न बोलता उर्फी जावेद का वेधतेय लक्ष?

ती पुन्हा आलीये.... 

Updated: Dec 2, 2021, 11:16 AM IST
ती पुन्हा आलीये.... काहीही न बोलता उर्फी जावेद का वेधतेय लक्ष?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही चेहरे हे बऱ्याच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. 'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद (Urfi Javed) ही त्याच चेहऱ्यांपैकी एक. उर्फी ही फक्त ओटीटी शोमुळेच नव्हे, तर बोल्ड अंदाजामुळेही तिच्यावर सर्वांच्याच नजरा खिळतात. 

मनाला भावणार त्या कपड्यांमध्ये उर्फी माध्यमांसमोर येते. तिचा फॅशन सेन्स खऱ्या अर्थानं चौकटीबाहेरचा असतो. ज्यामुळं तिला अनेकदा इतरांच्या निशाण्यावरही यावं लागतं. 

नेटकऱ्यांचा तर एक वर्ग असाही आहे, जो सातत्यानं उर्फीवर टीका करत असतो. या साऱ्यामध्ये ही सौंदर्यवती मात्र आपल्याज धुंदीत असल्याचं दिसून येतं. 

कधी क्रॉप टॉप, कधी इनर्स तर कधी भलतंच काहीतरी अशाच रुपात उर्फी सर्वांसमोर येते. सोशल मीडियावर अशाच अंदाजातील फोटोही पोस्ट करत असते. 

तिचा हा अंदाज सर्वांना भावतोच असं नाही. पण, ट्रोलर्सकडे लक्ष न देणं हेच सध्या उर्फीचं लक्ष्य असल्याचं दिसत आहे. 

कारण आपली खिल्ली उडवणाऱ्यांना तिनं वेगळ्या अंदाजात काहीही न बोलता सडेतोड उत्तर दिलं आहे. 

इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत तिनं, हे करुन दाखवलं आहे. जिथे उर्फी एक डेनिम जॅकेट फ्लाँट करताना दिसते. या जॅकेटच्या मागे, 'माईंड युवर ओन बिझनेस' असं लिहिलेलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urrfii (@urf7i)

म्हणजेच खिल्ली उडवणाऱ्यांनो आपल्या कामाशीच काम ठेवा, इतरत्र लक्ष घालू नका असंच तिनं थेट सुनावलं आहे. उर्फीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा गाजत आहे.