'ब्रह्मास्त्र' ट्रेलर रिलीजआधी रणबीरचं मोठं वक्तव्य म्हणाला, लिव्हर, किडनी...

बॉलीवूड इंडस्ट्रीतील मोस्ट अवेटेड चित्रपट 'ब्रह्मास्त्र' ची गेल्या 5 वर्षांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. 

Updated: Jun 14, 2022, 08:33 PM IST
'ब्रह्मास्त्र' ट्रेलर रिलीजआधी रणबीरचं मोठं वक्तव्य म्हणाला, लिव्हर, किडनी... title=

मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीतील मोस्ट अवेटेड चित्रपट 'ब्रह्मास्त्र' ची गेल्या 5 वर्षांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. 2017 मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती आणि तब्बल 5 वर्षानंतर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १५ जून २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधी, अभिनेता रणबीर कपूरने सोशल मीडियावर म्हटलं आहे की, त्याच्या रिस्पॉन्ससाठी तो आतून मरत आहे.

रणबीर कपूरने जाहिर केली एक्साइटमेंट
तुम्हाला माहिती आहेच की, रणबीर कपूर सोशल मीडियावर सक्रिय नसतो. अशा परिस्थितीत त्याने 'ब्रह्मास्त्र'च्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो चित्रपटाच्या ट्रेलरसाठी उत्साहित दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो असं म्हणताना ऐकू येतं, ''उद्याचा दिवस माझ्यासाठी खास आणि अद्भुत आहे. उद्या 'ब्रह्मास्त्र' चा ट्रेलर येणार आहे. मला माहीत आहे की, तुम्ही सर्वजण खूप दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहात आणि मी सुद्धा तुमच्या प्रतिसादाची आतुरतेने वाट पाहत आहे. मी खरं तर आतून मरत आहे."

चित्रपटाला लिव्हर-किडनी दिली: रणबीर कपूर
रणबीर कपूरनेही या चित्रपटासाठी आपलं रक्त आणि घाम घाळल्याचं सांगितलं. तो म्हणाला, "मला माहित नाही की मला ब्रह्मास्त्र सारख्या चित्रपटाचा भाग बनण्याची संधी पुन्हा मिळेल की नाही. हा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही आमचं रक्त, घाम, वेळ, हृद्य, आत्मा, लीवर, किडनी, सगळं काही दिलं आहे आणि मला आशा आहे की, हा चित्रपट तुम्हाला आनंदित करेल.

तसंच तुम्हाला शेवटपर्यंत कनेक्ट ठेवेल. रणबीरने त्याच्या चाहत्यांना ट्रेलर पाहण्याची आणि प्रतिक्रिया देण्याची विनंती केली. सोशल मीडियावर नसला तरी सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून उत्तर देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.