मुंबई : इटलीतील लेक कोमो परिसरात सध्या भारत चेहऱ्यांचीच गर्दी जास्त दिसत असल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. मुळात यामागे निमित्तही तसंच आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या विवाहसोहळ्यासाठी लेक कोमो परिसर सजला असून, अवघ्या काही तासांमध्येच त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणाही करण्यात येणार आहे.
'दीप-वीर' काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कुटुंबीयांसह इटलीत दाखल झाले. पण, त्यानंतर त्यांचा कोणताच नवा फोटो मात्र सोशल मीडियावर आला नाही.
आपल्या विवाहसोहळ्याविषयी या दोघांनीही बरीच गोपनियता पाळली असून, त्यासाठी त्यांनी पाहुणे मंडळींचं सहकार्यही घेतलं आहे.
खुद्द या जोडीच्या परवानगीशिवाय कोणताच फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येणार नसल्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दीपिका आणि रणवीर त्यांच्या लग्नाच्या फोटोंविषयी इतकी गोपनियता का बाळगत आहेत याच प्रश्नाने सध्या असंख्य चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.
'टाईम्स नाऊ'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार इतरांकडून सोशल मीडियावर फोटो पोस्ट होण्यापूर्वी खुदद् ही सेलिब्रिटी जोडी त्यांचा आनंद आणि हे खास क्षण स्वत: चाहत्यांसोबत शेअर करु इच्छितात. त्यामुळेच त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
कोणताच चुकीच्या पद्धतीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट होऊ नये यावर नजर ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी पाहुणे मंडळींनाही विवाहसोहळ्यासाठी आलेल्या खास छायाचित्रकारांनी टीपलेले फोटोच पोस्ट करण्याची विनंती केली आहे.
बॉलिवूडच्या 'राम-लीला'ने घेतलेला हा निर्णय पाहता, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली प्रमाणेच लग्नसोहळा पार पडल्यांतर दिवसअखेर या जोडीचे सुरेख फोटो पाहता येणार आहेत हेच आता स्पष्ट होत आहे.
#DeepikaRanveerWedding