'राजा हिंदुस्तानी'मधील 'त्या' किसिंग सीनविषयी करिष्माचा मोठा खुलासा

किस्सा किस का.... 

Updated: Mar 9, 2020, 08:16 PM IST
'राजा हिंदुस्तानी'मधील 'त्या' किसिंग सीनविषयी करिष्माचा मोठा खुलासा
'राजा हिंदुस्तानी'मधील 'त्या' किसिंग सीनविषयी करिष्माचा मोठा खुलासा

मुंबई : परफेक्शनिस्ट अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आमिर खान याच्या चित्रपटांपैकी प्रत्येक चित्रपट गाजण्याचं वेगळं आणि तितकंच खास असं किमान एक कारण तरी आहेत. चित्रपटाच्या संगीतापासून मग त्यातील कोणत्या एका दृश्यापर्यंत. प्रत्येकदा आमिरने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याच्या याच चित्रपटांपैकी एक म्हणजे 'राजा हिंदुस्तानी'. 

करिष्मा कपूर आणि आमिर खान यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटातील एका दृश्यामुळे तो भलताच चर्चेत आला. हे दृश्य होतं आमिर आणि करिष्मामध्ये चित्रीत करण्यात आलेलं एक चुंबनदृश्य अर्थात किसिंग सीन. अनेकांच्या मते हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरण्याचं हेसुद्धा एक कारण. पण, या दृश्यामागेसुद्धा एक कहाणी आहे हे तुम्ही जाणता का ? 

कहाणी म्हणण्यापेक्षा हा एक प्रकारचा संघर्ष करिष्माने सर्वांपुढे ठेवला. आगामी वेब शोच्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना तिने ही बाब समोर ठेवली. या दृश्याचं चित्रीकरण उटी येथे करण्यात आलं होतं. ऐन फेब्रुवारी महिन्यात प्रचंड थंड वातावरणात कलाकारांना सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत चित्रीकरण करावं लागत होतं. हे त्यांच्यापुढे असणारं एक आव्हानच. 

'राजा हिंदुस्तानी'मधील याच दृश्याविषयी सांगताना करिष्मा म्हणाली, 'अनेकांना या दृश्याविषयी कुतूहल आहे. पण, ते कधी एकदा चित्रीत करतो असंच आम्हाला वाटत होतं. तेव्हा फेब्रुवारी महिन्यात रक्त गोठवणारी थंडी आणि तितकेच जोराने वाहणारे वारे, असं एकंदर वातावरण होतं. चित्रीकरणादरम्यानही आम्ही अक्षरश: थरथरत होतो. त्यामुळे माझ्या मते अशा परिस्थितीमध्ये काम करण्याचा तो एक वेगळाच काळ होता.'

पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत

'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटाने करिष्मा आणि आमिर खान या जोडीला प्रेक्षकांची बरीच पसंती मिळाली. नव्वदच्या दशकातील हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो. अशा या चित्रपटाच्या एका दृश्याविषयीचा हा 'किस चा किस्सा' सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.