जाणून घ्या ऋषी कपूर यांच्या संपत्तीचा आकडा

व्हाल थक्क...  

Updated: May 2, 2020, 07:06 PM IST
जाणून घ्या ऋषी कपूर यांच्या संपत्तीचा आकडा

मुंबई : ३० एप्रिल २०२० वर्षाची सकाळ कलाविश्वासाठी आणि चाहत्यांसाठी देखील अत्यंत धक्कादायक होती. कारण बॉलिवूडने दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांना गमावले. गेल्या दोन वर्षांपासून ते ल्यूकेमियाशी (leukemia) झुंज देत होते.  अखेर वयाच्या ६७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक एकापेक्षा एक चित्रपटांच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असायचे. शिवाय परखड मत मांडण्यामुळे त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली. सध्या ऋषी कपूर यांच्या संपत्तीविषयी चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

‘इंडिया.कॉम’नुसार, ऋषी कपूर यांची एकूण संपत्ती ४० मिलिअन डॉलर म्हणजेच जवळपास ३०० कोटींची असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईच्या पाली हिल स्थित त्यांचा एक बंगला आहे. या आलिशान घरात ते राहत होते. या बंगल्याचे नाव 'कृष्णा राज' असे आहे. हा बंगला जवळपास १ एकर जागेत साकारण्यात आला आहे. 

ऋषी यांचं कार कलेक्शन
ऋषी यांच्याकडे अनेक आलिशान कार आहेत. रॉयल एसयूव्ही आणि ऑडी त्यांच्या आवडतीच्या गाड्यांपैकी एक. शिवाय त्यांच्याकडे Porsche, Bentley, BMW यांसारख्या महागड्या गाड्या देखील आहेत. 

ऋषी यांच्या वर्षाची कमाई
रिपोर्ट्सनुसार त्यांच्या वर्षाची कमाई २० कोटी रुपये ऐवढी होती. अभिनयासोबतच ते चित्रपट निर्माते, दिग्दर्शक होते. याशिवाय ते काही व्यावसायिक उद्योगांमध्येही भागीदार होते. तसं ते अनेक जाहिराती, ब्रॅण्डसाठीही काम करत होते.