महेश बाबूच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल...

२००९ मध्ये आलेल्या सलमानच्या सुलतान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 27, 2018, 06:16 PM IST
महेश बाबूच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल... title=

मुंबई : २००९ मध्ये आलेल्या सलमानच्या सुलतान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाने सलमानच्या करिअरला वगळे वळण दिले असे म्हणायला काही हरकत नाही. कारण त्यानंतर सलमानने अॅक्शन चित्रपटांचा धडाकाच लावला. मात्र सलमानचा हा चित्रपट तेलगू सुपरस्टार महेश बाबूच्या एका चित्रपटावर आधारित आहे. 

फर्स्ट लूक अत्यंत व्हायरल

त्याचबरोबर वॉन्टेड हा देखील पोकिरी या महेश बाबूच्या चित्रपटाचा रिमेक आहे. आता महेश बाबूच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 'भारत आने नेनु' असे या चित्रपटाचे नाव असून महेश बाबू यात जबरदस्त भूमिकेत दिसणार आहे. त्याची झलक तुम्हाला फर्स्ट लूकमध्ये दिसेलच. चित्रपटाचा फर्स्ट लूक अत्यंत व्हायरल होत आहे.

प्रिन्स ऑफ टॉलिवूड 

वयाच्या चौ्थ्या वर्षी महेश बाबूने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. आता तो साऊथ चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रसिद्ध स्टार आहे. स्पायडर याच्या चित्रपटात त्याने तब्बल २५ कोटींचे मानधन घेतले होते. महेश बाबूला 'प्रिन्स ऑफ टॉलिवूड' असे म्हटले जाते. महेश बाबू साऊथ चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही अत्यंत लोकप्रिय आहे.