अभिनेता गुपचूप अडकला विवाहबंधनात; शुभेच्छा द्यायला पोहोचल्या सुप्रिया पिळगावकर

लग्नानंतर लगेचच शाहीर आणि रुचिकानं जम्मू गाठलं

Updated: Nov 27, 2020, 03:39 PM IST
अभिनेता गुपचूप अडकला विवाहबंधनात; शुभेच्छा द्यायला पोहोचल्या सुप्रिया पिळगावकर
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : टेलिव्हिजन विश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणाऱ्या अभिनेता शाहीर शोख Shaheer Sheikh  यानं काही दिवसांपूर्वीच त्याच्या खासगी जीवनाबाबत अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला होता. आपल्या जीवनात आलेल्या एका खास व्यक्तीसोबत आयुष्यभराचं अनोखं नात त्यानं सर्वांसमोर आणलं होतं. ज्यानंतर आता चर्चा रंगल्या आहेत त्या म्हणजे शाहीरच्या लग्नाच्या.

काही दिवसांपूर्वीच शाहीरनं कोर्ट मॅरेज पद्धतीनं लग्न केल्याची माहिती आणि त्यांच्या लग्नाचे काही खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये शाहीर आणि त्याची पत्नी रुचिका कपूर अतिशय आनंदात दिसत आहेत. 

लग्न म्हटलं तरीही या दोघांचा पेहरावही अतिशय सुरेख आणि अजिबातच भडक पाहायला मिळत नाही हे या फोटोत पाहायला मिळत आहे. शाहीरनं या खास क्षणी पांढऱ्या रंगाचा कुर्ता- पायजमा तर, रुचिकानं आकाशी रंगाच्या सलवार कमीजला प्राधान्य दिलं होतं. 

जीवनातील या नव्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या शाहीर आणि रुचिकाला यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या लग्नाचे साक्षीदार होण्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनीही उपस्थिती लावली होती. नवविहाहित जोडीसोबतचा त्यांचाही फोटो व्हायरल होत आहे. 

width: 640px; height: 483px;

width: 640px; height: 885px;