'या' अभिनेत्याने 5 चित्रपटांमधून ऐश्वर्याला दाखवला बाहेरचा रस्ता; अखेर त्यालाच मागावी लागली माफी

काही कारण नसताना अभिनेत्याने चित्रपटातून ऐश्वर्याला दाखवला बाहेरचा रस्ता

Updated: Sep 21, 2021, 11:49 AM IST
'या' अभिनेत्याने 5 चित्रपटांमधून ऐश्वर्याला दाखवला बाहेरचा रस्ता; अखेर त्यालाच मागावी लागली माफी

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना लोक एकत्र पाहाण्यासाठी उत्सूक असतात. त्यातील एक म्हणजे अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन. दोघांनी 'जोश', 'देवदास', 'मोहब्बते' अशा अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. या सर्व चित्रपटांमध्ये दोघांनी कपलची भूमिका साकारली. दोघांमधील केमिस्ट्रीने चाहत्यांचे मन जिंकले. पण दुसरीकडे ऐश्वर्याने शाहरूखवर चित्रपटांमधून बाहेर काढण्याचा आरोप केले. सिमी ग्रेवालच्या शोमध्ये ऐश्वर्याने शाहरूखवर आरोप केले. 

शोमध्ये 'शाहरूख खानने तुला 5 चित्रपटांमधून बाहेरचा रस्ता दाखवला?' यावर ऐश्वर्या म्हणाली, 'माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर असेल? अशी वेळ होती जेव्हा आमच्या आगामी चित्रपटांबद्दल चर्चा असायची. पण अचानक मला चित्रपटांमधून बाहेर करण्यात आलं. काही कारण नसताना असं का झालं?' असा प्रश्न ऐश्वर्याने यावेळी उपस्थित केला.

ऐश्वर्याने शाहरुखबाबत केला मोठा खुलासा

शाहरूखने मागितली माफी
ऐश्वर्याला चित्रपटांमधून काढल्यानंतर शाहरूखने तिची माफी मागितली. 2003 साली शाहरूखने इंडिया टूडेला मुलाखत दिली. तेव्हा शाहरूख म्हणाला, 'काही कारण नसताना ऐश्वर्याला चित्रपटातून काढण्यात आलं. या गोष्टीचं मला अत्यंत वाईट वाटलं. ऐश्वर्या माझी चांगली मैत्रीण आहे आणि यासाठी मी ऐश्वर्याची माफी मागतो....'

यानंतर शाहरूख आणि ऐश्वर्या 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले. चित्रपटात शाहरूखने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली, तर दुसरीकेड ऐश्वर्याच्या अभिनयाचं सर्वचं स्तरातूव कौतुक करण्यात आलं.