रात्री उशीरापर्यंत Janhvi Kapoor सोबत हा मुलगा कोण? मिस्ट्री बॉयच्या सर्वत्र चर्चा

'हा' मिस्ट्री बॉय फक्त जान्हवीसोबतचं नाही, तर इतर स्टारकिड्ससोबत देखील दिसतो.    

Updated: May 11, 2022, 03:28 PM IST
रात्री उशीरापर्यंत Janhvi Kapoor सोबत हा मुलगा कोण? मिस्ट्री बॉयच्या सर्वत्र चर्चा  title=

मुंबई : सोशल मीडियावर लोकांना आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना फॉलो करायला फार आवडते. कारण येथे त्यांना आपले आवडते सेलिब्रिटी काय करत आहेत हे पाहायला मिळतं. जान्हवी कपूरच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. जान्हवी तिच्या ग्लॅमरस अंदाज आणि रॉयल लाईफस्टाईलमुळे कायम चर्चेत असते. 

एवढंच नाही तर मित्रांसोबत पार्टी करताना देखील तिला अनेक वेळा स्पॉट करण्यात आलं आहे. सध्या एका पार्टीतील तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 
 
महत्त्वाचं म्हणजे आता फक्त जान्हवी कपूर नाही, तर तिच्यासोबत असलेल्या मिस्ट्री बॉयची देखील चर्चा रंगत आहे. जान्हवी कपूरने पार्टीच्या काही फोटोंचा कोलाज बनवला आहे आणि तो इंस्टाग्रामवर चाहत्यांसह शेअर केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटोंमध्ये जान्हवी कपूर एका खास मित्राच्या अगदी जवळ दिसत आहे. त्यामुळे जान्हवीसोबत असलेला मिस्ट्री बॉय कोण अशी चर्चा रंगत आहे. हा मिस्ट्री बॉय फक्त जान्हवीसोबतचं नाही, तर इतर स्टारकिड्ससोबत देखील दिसतो.  

जान्हवी कपूर सोबत दिसणाऱ्या मिस्ट्री बॉयचं नाव ओरहान (Orhan) आहे.  ओरहान सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. 

कोण आहे ओरहान? 
ओरहानने कोलंबिया यूनिव्हर्सिटीतून पदवी घेतली आहे. ओरहानच्या कुटुंबाबद्दल अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही. ओरहान कायम सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. त्याची अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत देखील चांगली मैत्री आहे.