अभिनेत्री काजोल वाढवणार मादाम तुसादची शान

जगभरात लंडनमधील मॅडम तुसाद हे आपल्या वॅक्स म्यूजियमसाठी प्रसिद्ध आहे. येथे आपला मेनाचा पुतळा असणे त्याच्यासाठी मोठ्या सन्मानाची गोष्ट असते. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 14, 2018, 04:19 PM IST
अभिनेत्री काजोल वाढवणार मादाम तुसादची शान title=

मुंबई : जगभरात लंडनमधील मॅडम तुसाद हे आपल्या वॅक्स म्यूजियमसाठी प्रसिद्ध आहे. येथे आपला मेनाचा पुतळा असणे त्याच्यासाठी मोठ्या सन्मानाची गोष्ट असते. 

या म्यूजियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सचिन तेंडुलकर, ऐश्वर्या राय बच्चन यांचे मेनाचे पुतळे आहेत. आता अभिनेत्री काजोलचा देखील मेनाचा पुतळा येथे बनणार असल्याची चर्चा आहे. याची तयारी देखील काही महिन्यापूर्वी झाली आहे. पण फोटोसोबत याची घोषणा या वर्षी होऊ शकते.

असं म्हटलं जातंय की, या खास प्रसंगी संपूर्ण परिवार काजोलसोबत असणार आहे. पती अजय देवगन देखील यावेळी उपस्थित राहणार आहे. म्यूझियमचे काही कर्मचारी याआधीच तिला भेटले आहेत.

म्यूझियमशी संबंधित लोकांच्या मतानुसार हा खूपच खास प्रसंग आहे जेव्हा बॉलिवूडच्या एका खास कुटुंबातून असणारी, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आणि एक यशस्वी अभिनेत्री आता मॅडम तुसाद म्यूझियमची शान वाढवणार आहे. काजोलने आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. काजोल अनेक महिला आणि बाल कल्याणाशी संबंधित संस्थांसोबत देखील काम करते आहे.