मुंबई : वादाचा मुकुट कायम आपल्या डोक्यावर मिरवणारी अभिनेत्री कंगना रानौत कायम वादाच्या भोवऱ्यात असते. कंगना नेहमी राजकीय सामाजिक किंवा चालू मुद्द्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत मांडत असते. आता सध्या सर्वत्र कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत नियम अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये थिएटर्स, नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Right after this meeting he closed the theatres for whole month, such a shame, why can’t world’s best CM announce complete lockdown for a week and break the chain of virus transmission.This partial lockdown is not stopping the virus but only the business #maharashtralockdown https://t.co/t6UGE1B3AV
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 4, 2021
राज्य सरकारच्या याच निर्णयावर कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटच्या माध्यमातून तिने राज्य सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. 'बैठकीनंतर सरकारने पूर्ण एक महिना सिनेमाघर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जगातले बेस्ट मुख्यमंत्री व्हायसरची साखळी तोडण्यासाठी आठवड्याभरासाठी लॉकडाऊन का नाही करत?'
पुढे कंगना म्हणाली, 'लॉकडाऊनमुळे व्हायसर नाही तर व्यापार बंद पडेल...' कंगनाचे हे ट्विट सध्या तुफान चर्चे आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन लागू करण्याच्या हालचाली सुरू होत्या. पण आज झालेल्या बैठकीत 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन नसल्याचा पण कठोर निर्बध लावण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.