मुंबई : निर्माता, दिग्दर्शक करण जोहर कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. स्टार प्लसवरील रिअॅलिटी शोमध्ये ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार’मध्ये 'कमला पसंद' ची जाहीरात केल्याने त्याला दिल्ली आरोग्य विभागाने नोटीस जारी केली आहे.
त्याच्यासोबतच रोहित शेट्टी, स्टार प्लस चॅनलच्या प्रोडक्शन कंपनी एंडमोल इंडियालादेखील ही नोटीस पाठिविण्यात आली आहे.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार या टीव्ही शोमध्ये तंबाखूचा प्रचार करण्याबद्दल सिगारेट आणि टोबॅको प्रोडक्ट्स अॅक्ट (२००३) च्या सेक्शन ५ अंतर्गत ही नोटीस जारी करण्यात आली आहे.
करणला नोटीस जारी केल्याने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. जर तंबाखूचा प्रचार थांबवला नाही तर त्याला ५ वर्षाची शिक्षा आणि २ हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
१० दिवसांत त्यांना या नोटीसचे उत्तर द्यावे लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अन्यथा यांच्याविरुद्ध तक्रार करण्याच्या तयारीत आरोग्य विभाग आहे.
स्टार प्लसवरील या रिअॅलिटी शो ला पाहणारा जास्त प्रेक्षक हा तरुण आहे. अशावेळी या शोमध्ये तंबाखूची जाहीरात करणे हे प्रेक्षकांच्या मन आणि मेंदूला प्रभावित करण्यासारखे असल्याची चिंता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.