बॉयफ्रेंड अर्जुनला रॅम्प वॉक करताना पाहताच, मलायकानं केलं असं की...; व्हिडीओ व्हायरल

मलायका आणि अर्जुनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Jul 31, 2022, 10:38 AM IST
बॉयफ्रेंड अर्जुनला रॅम्प वॉक करताना पाहताच, मलायकानं केलं असं की...; व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अर्जुन हा त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री मलायका अरोराच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असतो. अर्जुन आणि मलायका बऱ्याचवेळा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. त्या दोघांमध्ये असलेला वयाच्या फरकामुळे ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात. त्या दोघांनी नुकत्याच एका फॅशनशोमध्ये हजेरी लावली होती. त्याच दरम्यान, त्या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यावेळी मलायकानं ज्या प्रकारे अर्जुनला त्याच्या शोसाठी चिअर केलं तो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

अर्जुनचा हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत अर्जुन प्रेक्षकांच्या समोर रॅम्पवर येताना दिसतो. हे पाहताच मलायका जोरात टाळ्या  वाजवू लागते तर नंतर ती अर्जुनचा व्हिडीओ शूट करताना दिसली. अर्जुन मलायकाचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये अर्जुन कपूरनं ऑल ब्लॅक लूकमध्ये हॅन्डसम दिसत आहे. यासोबतच मलायकानं सिल्व्हर-गोल्डन ब्लेजर आणि मिनी ड्रेसमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. त्या दोघांचा लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा जिथे जिथे एकत्र हजेरी लावतात तिथे ते सगळ्यांचे लक्ष वेधताना दिसतात. मलायका अर्जुन कपूरपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. वयात अंतर असूनही दोघांची केमिस्ट्री दिसून येते. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता अर्जुन कपूरचा 'एक व्हिलन रिटर्न' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अर्जुनच्या या चित्रपटात त्याच्याशिवाय जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारिया देखील दिसणार आहेत. याशिवाय तो 'कुत्ते' या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत राधिका मदान, तब्बू आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही भूमिका आहेत. पुढे, अर्जुन आसमान  भारद्वाजच्या अनटोल्ड आणि अजय बहलच्या 'द लेडी किलर'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर दिसणार आहे.