करण जोहर - मनीष मल्होत्रा कपल? सोशल मीडियावर चर्चा

काय आहे सत्य?

करण जोहर - मनीष मल्होत्रा कपल? सोशल मीडियावर चर्चा

मुंबई : बॉलिवूडमधील करण जोहर आणि फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्रा यांच्यातील मैत्री काही लपून राहिलेली नाही. करण - मनीष एकमेकांसोबत रिलेशनशीप असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. हे दोघं कपल असल्याची चर्चा रंगली असून अशा चर्चा कायम अफवा समजल्या जातात. करण जोहरच्या बर्थ डे दिवशी मनीष मल्होत्राने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. कॅप्शनमध्ये त्याने करण जोहरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या फोटोवर यूझरने कमेंट करताना लिहिले आहे की, तुम्ही सर्वात क्यूट कपल आहे. युझरच्या या कमेंटवर मनीष मल्होत्राने लाईक केलं आहे. 

या फोटोखाली युझरने कमेंट केली आहे. आणि हीच कमेंट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या कमेंटला मनीष मल्होत्राने देखील लाईक केलं आणि मग चर्चांना जास्त उधाण आलं आहे.

करण जोहरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे आता अखेर मनीष मल्होत्राने यावर आपली मौन सोडलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मनीष मल्होत्राने या गोष्टी नाकारल्या आहेत. हे सगळं एकदम बकवास आहे. करण जोहर मला माझ्या भावासारखा आहे.