मुंबई-पुणे-मुंबई ३ च्या चित्रीकरणाला सुरूवात...

मराठी चित्रपटसृष्टीतील इव्हरग्रीन अभिनेता स्वप्निल जोशी आणि हुशार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या जोडीचा मुंबई-पुणे-मुंबई हा चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरला.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 6, 2017, 09:25 AM IST
 मुंबई-पुणे-मुंबई ३ च्या चित्रीकरणाला सुरूवात... title=

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील इव्हरग्रीन अभिनेता स्वप्निल जोशी आणि हुशार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या जोडीचा मुंबई-पुणे-मुंबई हा चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरला.

आनंदाची बातमी

त्यानंतर ही जोडी अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तरी मुंबई-पुणे-मुंबई चा प्रभाव इतका होता की त्यामुळे मुंबई-पुणे-मुंबई २ हा या चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन ही जोडी पुन्हा रसिकांच्या भेटीला आली. या चित्रपटाच्या यशानंतर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. मुंबई-पुणे-मुंबई ३ मधून स्वप्निल आणि मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून स्वप्निल जोशीनेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या फॅन्सना ही आनंदाची बातमी दिली आहे. 

प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

एखादा चित्रपट हिट झाला की, त्याचा सिक्वल बनवण्याचा हॉलिवूड, बॉलिवूडचा ट्रेंड आता मराठीतही पाहायला मिळत आहे. मुंबई-पुणे-मुंबई २ या चित्रपटानंतर पुढचा भाग पाहाण्याची इच्छा अनेकांची होती. त्यामुळे स्वप्निलने दिलेल्या माहितीमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.