...म्हणून नवजोत सिंग सिद्धू भडकले !

सध्या कॉमेडीयन कपिल शर्मा कोणत्या ना कोणत्या वादावरून चर्चेत आहे. अनेकदा तर नकळत काही वादांशी त्याचे नाव जोडले जाते. पुन्हा एकदा एका नवीन वादात कपिल अडकला आहे. बॉलिवूड.कॉम या वेबसाईटच्या वृत्तानुसार यावेळेस त्याचा वाद नवजोत सिंग सिद्धू यांच्याशी झाला आहे. गेल्या काही काळापासून नवजोत सिंग सिद्धू आजारी होते. त्यामुळे रविवारी ते शूटिंगला हजर राहू शकले नाहीत. नवजोत सिंग शूटिंगला न गेल्याने शूटिंग रखडेल आणि सिद्धू यांची खुर्ची देखील रिकामी राहील. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 15, 2017, 02:59 PM IST
...म्हणून नवजोत सिंग सिद्धू भडकले ! title=
कपिलने सिद्धू यांना विचारल्याशिवाय अर्चना पूरन सिंगला शूटिंगसाठी बोलावले.

नवी दिल्ली: सध्या कॉमेडीयन कपिल शर्मा कोणत्या ना कोणत्या वादावरून चर्चेत आहे. अनेकदा तर नकळत काही वादांशी त्याचे नाव जोडले जाते. पुन्हा एकदा एका नवीन वादात कपिल अडकला आहे. बॉलिवूड.कॉम या वेबसाईटच्या वृत्तानुसार यावेळेस त्याचा वाद नवजोत सिंग सिद्धू यांच्याशी झाला आहे. गेल्या काही काळापासून नवजोत सिंग सिद्धू आजारी होते. त्यामुळे रविवारी ते शूटिंगला हजर राहू शकले नाहीत. नवजोत सिंग शूटिंगला न गेल्याने शूटिंग रखडेल आणि सिद्धू यांची खुर्ची देखील रिकामी राहील. 
यामुळे कपिलने सिद्धू यांना विचारल्याशिवाय अर्चना पूरन सिंगला शूटिंगसाठी बोलावले. परंतु, सिद्धू यांना ही बातमी कळताच त्यांना खूप राग आला. यावरून कपिल आणि त्यांच्यात वाद झाला. कपिलने सिद्धू यांना समजवण्याचा खूप प्रयन्त केला. परंतु, ते काही समजण्याच्या स्थितीत नव्हते. त्यानंतर कपिलने अर्चनाला फोन करून शूटिंगला येऊ नको, असे सांगितले. 
सिद्धू यांनी कपिलला नेहमीच साथ दिली आहे. जेव्हा सगळ्यांनी कपिलचा शो सोडण्याचा विचार केला होता तेव्हा देखील सिद्धू यांनी त्याची साथ सोडली नव्हती. कपिलच्या शो साठी त्यांनी नेहमी आपली वेळ अड्जस्ट केली. त्याचबरोबर कोणतेही आढेवेढे न घेता त्यांनी २-३ दिवस आधी देखील शूटिंग पूर्ण केले होते. यामागे एडिटिंगमध्ये कोणतीही अडचण येऊ नये, हाच त्यांचा उद्देश होता. परंतु, कपिलचे हे वागणे, त्यांना न सांगता त्यांच्या ऐवजी पर्याय शोधणे यामुळे सिद्धू खूप नाराज झाले.