#MeToo च्या चळवळीत अडकला लेखक
व्हायर होतोय व्हॅट्सअॅप स्क्रीन शॉट
मुंबई : #MeToo आता एका आगीच्या लोणप्रमाणे पसरत जाणार अभियान म्हणाव लागेल. आता या आगीत मोठ मोठ्या मंडळींचा चेहरा समोर येत आहे. या प्रकरणामुळे तर बॉलिवूड दोन भागात विभागल्याचा दिसत आहे. तसेच आता साहित्य क्षेत्रातील वेगवेगळी नावं देखील समोर येताना दिसत आहे. आताच एका महिलेने सेलिब्रिटी लेखक चेतन भगतवर आरोप लावले आहेत असताना एका अनोळख्या मुलीने लेखक सुहेल सेठच्या मॅसेजचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण 2010 चं आहे. 17 वर्षांच्या मुलीला सुहेल सेठने दारू ऑफर केली होती. आता अनिशा शर्मा नावाच्या प्रोफाइलवर याचे स्क्रीन शॉर्ट आपण पाहू शकतो.
अनिशा शर्माच्या म्हणण्यानुसार, 17 वर्षांची असताना ती ट्विटरवर सुहेल सेठला फॉलो करत होती. मला त्यांची मुलाखत घ्यायची होती. एकदा मी त्यांना लँड अँड च्या कॉफी शॉपमध्ये पाहिलं. जेव्हा मी बाहेर पडत होती. त्यानंतर मी त्यांना तसं ट्विट केलं. मी तुमची खूप मोठी चाहती आहे पण तुम्हाला समोर बघून काहीच बोलू शकली नाही. त्यानंतर त्यांचा डायरेक्ट एक मॅसेज आला. आणि त्यानंतर एकदा मी कुटुंबासोबत जेवत असताना त्यांचा दुसरा मॅसेज आला की, माझ्यासोबत दारू पिणार का? त्या मॅसेजच्या शेवटी लिहिलं होतं की, Big wild Kiss... हा मॅसेज वाचून मी घाबरले आणि त्यांना कोणताच रिप्लाय न देता ब्लॉक केलं.
या आरोपाबद्दल सुहेल सेठला विचारलं असता त्यांनी हे आरोप फेटाळले. तेव्हा त्यांनी सांगितलं की, ही घटना जेव्हा घडली तेव्हा मी भारतात नव्हतो. काही कामा करता मी विदेशात गेलो होतो. माझ्याकडे पासपोर्टवर स्टॅम्प असून मी त्याचा पुरावा म्हणून वापर करेन.