एका रात्रीत स्टार झालेली प्रिया प्रकाश सुप्रीम कोर्टात...

आपल्या डोळ्यांच्या अॅक्शनने अनेकांना घायाळ करणारी आणि एका रात्रीत प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश सुप्रीम कोर्टात गेली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 20, 2018, 12:12 PM IST
एका रात्रीत स्टार झालेली प्रिया प्रकाश सुप्रीम कोर्टात... title=

नवी दिल्ली : आपल्या डोळ्यांच्या अॅक्शनने अनेकांना घायाळ करणारी आणि एका रात्रीत प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश सुप्रीम कोर्टात गेली आहे.

प्रिया प्रकाश सुप्रीम कोर्टात

प्रिया प्रकाशने आपल्या सिनेमा विरोधात केलेल्या याचिकेवर स्टे आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोकला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये दाखल याचिकेत प्रियाचे वकील यांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर सुनावणी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात मंगळवारी चीफ जस्टिस दीपक मिश्रा यांच्या बेंचद्वारे सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सिनेमाविरुद्ध याचिका

प्रिया प्रकाश आणि मल्याळम सिनेमा 'ओरू अडार लव'च्या निर्मात्यांविरोधात तेलंगना आणि महाराष्ट्रातील कथित एक समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तेलंगनामध्ये काही युवकांनी सिनेमाच्या व्हायरल गाण्यातून एका विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप करत दिग्दर्शकांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता.

कधी रिलीज होणार सिनेमा

प्रिया प्रकाशचा मल्याळम सिनेमा 'ओरू अडार लव' 3 मार्च, 2018 ला रिलीज होणार आहे. या सिनेमातील गाणं 'मानिका मलयारा पूवी' आताच रिलीज झालं. या गाण्यातून प्रिया प्रकाश चांगलीच प्रसिद्ध झाली. इंस्टाग्रामवर प्रियाच्या फॉलोअर्सची संख्या २४ तासात १० लाखांच्या वर गेली. प्रिया आता फक्त १८ वर्षांची आहे. त्रिशूरमधील विमला कॉलेजमध्ये ती बी. कॉम फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे. तिच्या डेब्यू सिनेमात ती एका विद्य़ार्थिनीचा रोल करत आहे.