'काला'नंतर रजनीकांतच्या '२.० ' सिनेमाचा टीझर लीक

सिनेमा २.० च्या टीझर लीक झाल्याची बातमी येत आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Mar 4, 2018, 04:23 PM IST
'काला'नंतर रजनीकांतच्या '२.० ' सिनेमाचा टीझर लीक title=

नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत यांच्या सिनेमाचा टीझर लिक झालाय. रजनीकांत यांचा आगामी सिनेमा 'काला'चा टीझर लीक झाल्याच्या बातमी समोर आली होती.

आता दुसरा मोठा सिनेमा २.० च्या टीझर लीक झाल्याची बातमी येत आहे.

चाहते नाराज 

 यामुळे रजनीकांतच्या चाहत्यांमध्ये मोठी नराजी आहे. निर्मातेही याविरुद्ध तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. 

४०० कोटींचा बजेट 

देशातील सर्वात महागडा सिनेमा असलेल्या '२.० ' कडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत अक्षय कुमारही दिसणार आहे.

सायन्स फिक्शनवर आधारित या सिनेमाचा बजेट ४०० कोटी रुपये आहे. 

टीझर व्हायरल 

टीझर लॉन्च होण्याआधीच लीक होणं हे निर्माते आणि फॅन्ससाठी दु:खद आहे. आतापर्यंत निर्मात्यांकडून कोणती टीझर रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली नाही.

सोशल मीडियावर लीक झालेला व्हिडियो शेअर केला जातोय.