सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित वेब सीरिजमध्ये राजकुमार

राजकुमार राव आणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखाने सिटीलाईट्स या सिनेमात एकत्र काम केले होते. त्यानंतर आता हे दोघंही सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 30, 2017, 11:16 PM IST
सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित वेब सीरिजमध्ये राजकुमार title=

मुंबई : राजकुमार राव आणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखाने सिटीलाईट्स या सिनेमात एकत्र काम केले होते. त्यानंतर आता हे दोघंही सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत.

वेब सीरिजमध्ये राजकुमार सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत दिसतील पत्रलेखा नंदिनी यांच्या भूमिकेत दिसेल. 

राजकुमारने सांगितले, शाळेमध्ये एंट्री करताच बोस यांचा पुतळा होता. १२ वर्षे मी त्यांना पाहत होते. त्यांच्याबद्दल अधिक काही माहीत नव्हते. मात्र सीरिज केल्यानंतर अनेक गोष्टी त्यांच्या बद्दल समजल्या.

त्यांची भूमिका साकारताना जे काही वाटतं होतं ते कमाल होतं. त्या दरम्यान मी उत्साहित असायचो. मी जर त्या काळात जन्माला आलो असतो तर नक्कीच स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला असता. 

या वेबसीरिजद्वाके मला बोस बाबू यांचे जीवन जगण्याची संधी मिळाली. मी कोलकातामधीलही त्याच्या घरात खूप वेळ व्यतीत केला. मी खूप वेळ त्यांच्या कपड्यांसोबत तसेच त्यांच्या सामानांसोबत व्यक्त केलाय.

नेताजींनी जे काही केलं त्यामागे एकच कारण होतं ते म्हणजे देशाची सेवा. इंग्रज खरोखरच त्यांना घाबरायचे. 

सिनेमांमबद्दल बोलताना तो म्हणाला, २०१७ हे वर्ष माझ्यासाठी खास होते. २०१८मध्येही चांगले सिनेमे येतायत. फन्ने खां या सिनेमाशिवायही अनेक सिनेमे येत आहेत.-