Sara Ali Khan चे 'या' बॉलिवूड कलाकारांसोबत होते संबध..! लव्हबाईटमुळे आली होती चर्चेत

 Sara Ali Khan Affairs : अनेक सेलिब्रिटींसोबत ती रिलेशनशिपमध्येही होती. अनेक मोठ्या सेलिब्रिटींना तिने डेट केलं आहे. आज आम्ही तुम्हाला सारा अली खानच्या लव्हलाईफबद्दल सांगणार आहोत.

Updated: Jan 3, 2023, 04:27 PM IST
Sara Ali Khan चे 'या' बॉलिवूड कलाकारांसोबत होते संबध..! लव्हबाईटमुळे आली होती चर्चेत title=

 Sara Ali Khan Affairs ​: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) नेहमी  कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती तिच्या पर्सनल लाईफसोबतच तिच्या प्रोफेशनल लाईफमुळेही चर्चेत असते. साराने आत्तापर्यंतच्या सगळ्यात बड्या अभिनेत्यांसोबत झळकली आहे. अनेक सेलिब्रिटींसोबत ती रिलेशनशिपमध्येही होती. अनेक मोठ्या सेलिब्रिटींना तिने डेट केलं आहे. आज आम्ही तुम्हाला सारा अली खानच्या लव्हलाईफबद्दल सांगणार आहोत. अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सारा अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

ईशान खट्टर
शाहिद कपूरचा छोटा भाऊ ईशान खट्टर आपल्या पर्सनल लाईफमुळे नेहमी चर्चेत असतो. अनन्या पांडे व्यतिरिक्त तिचं नाव सारासोबत जोडलं गेलं आहे. असं म्हटलं जात की, या दोघांनी ऐकमेकांना डेट केलं आहे मात्र त्यांनी त्यांच नातं कधीच जगासमोर आणलं नाही. त्यांनी नेहमीच सगळ्यांसमोर त्यांचं नातं मैत्रीचं असल्याचं सांगितलं.

हर्षवर्धन कपूर
बॉलिवूडमध्ये लखन म्हटलं जाणाऱ्या प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरमुळेही सारा खूप चर्चेत होती. असं म्हटलं जातं की, हे कपल खूप सिक्रेटली ऐकमेकांना डेट करत होतं. अनेक पार्ट्यांमध्ये या दोघांना स्पॉट केलं गेलं आहे. मात्र साराने किंवा हर्षवर्धनने कधीच आपल्या रिलेशनशिपवर वक्तव्य केलं नाही.

 सुशांत सिंग राजपूत
सारा अली खानने आपल्या करिअरची सुरुवात दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत केली होती. साराने सुशांतसोबत 'केदारनाथ' या सिनेमामध्ये काम केलं होतं. 'केदारनाथ' चित्रपटात काम करताना या दोघांमधील जवळीक वाढल्याचं बोललं जातं. यानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंचीही चर्चा झाली होती.

कार्तिक आर्यन
सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांनी इम्तियाज अलीच्या 'लव आज कल' चित्रपटात काम केलं होतं. असं म्हटलं जातं की, हे दोघं बराच काळ ऐकमेकांना गुपचूप डेट करत होते. त्यांच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत होती.

इतकंच नाही तर जेव्हा सारा अली खान कॉफी विथ करणमध्ये पोहोचली तेव्हाही तिने खुलासा केला होता की, तिला कार्तिक आर्यनला डेट करायचं आहे. साराच्या या विधानानंतर या दोघांबाबत चर्चा सुरू झाली होती. यानंतर सारा अली खानचे काही पर्सनल फोटोही व्हायरल झाले होते, ज्यामध्ये सारा अली खानच्या गळ्यावर लव्ह बाइट्सही दिसले होते.