...म्हणून माधुरी आणि जुहीने केलं नाही कोणत्या अभिनेत्यासोबत लग्न

इंडस्ट्रीमध्ये देखील माधुरी आणि जुहीच्या चाहत्यांची संख्या मोठी होती.

Updated: May 31, 2021, 09:43 AM IST
...म्हणून माधुरी आणि जुहीने केलं नाही कोणत्या अभिनेत्यासोबत लग्न

मुंबई :  एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि जूही चावला (Juhi Chawla) या अभिनेत्रींचं बॉलिवूडवर राज्य होतं. दोघींनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपटं दिली. सर्वत्र त्यांच्याचं नावाचा बोलबाला होता. इंडस्ट्रीमध्ये देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या मोठी होती. पण त्यांनी बॉलिवूड अभिनेत्यासोबत लग्न केलं नाही. त्यांनी बॉलिवूडबाहेर लग्न केलं. माधुरी दीक्षितने 1999रोजी डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केलं. तर जुहीने 1995 रोजी इंडस्ट्रलिस्ट जय मेहतासोबत लग्न केलं. 'कॉफी विथ करण'च्या शोमध्ये त्यांनी बॉलिवूड अभिनेत्यांसोबत लग्न का केलं नाही? याचं कारण सांगितलं आहे. 

'कॉफी विथ करण'च्या शोमध्ये करणने माधुरी आणि जुहीला, 'बॉलिवूड अभिनेत्यासोबत लग्न का केलं नाही? ' असा प्रश्न विचारला. यावर माधुरी म्हणाली, 'मी शाहरूख खान, सलमान खान यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. आमिर खानसोबत देखील दोन चित्रपटांमध्ये काम केलं. पण लग्न करण्यासाठी मला ते आवडले नाहीत. माझे पतीचं माझ्यासाठी हिरो आहेत.' 

करणच्या प्रश्नावर जुही म्हणाली, 'जय मेहता यांनी मला आकर्षित केलं होतं. ते कायम मला कार्ड्स फुलं आणि गिफ्ट पाठवायचे. माझ्याकडे अनेक वस्तूंचासाठा जमा झाला. बॉलिवूडमध्ये प्रत्येक अभिनेता चांगला आहे. पण मला बॉलिवूडमधील अभिनेत्यासोबत  लग्न करायचं नव्हतं मला माझ्यासारखा पोर्टनर हवा होता आणि मी याबद्दल स्पष्ट होती.'

जुही आणि माधुरीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, जुही  'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. तर माधुरी 'कलंक' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. आता माधुरी  लवकरचं 'फाइंडिंग अनामिका' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.