मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं (Sonakshi Sinha ) 'दबंग' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सोनाक्षीनं वेगवेगळ्या भूमिका साकराल्या आहेत. सध्या सोनाक्षी तिच्या ‘डबल एक्सएल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात सोनाक्षी आणि हुमा कुरेशी लठ्ठ महिलांची कहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटातून बॉडी शेमिंगसारख्या विषय सगळ्यांसमोर मांडणार आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटासाठी तिला वजन वाढवण्यास सांगितल्याचं सोनाक्षीनं खुलासा केला.
हेही वाचा : रविवारच्या सुट्टीला पाहा सुपरस्टार प्रभासनं रेकमेंड केलेला चित्रपट; IMDb वर मिळालीये 9.5 रेटिंग
या मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली, 'आम्ही अभिनेत्रींना प्रत्येक चित्रपटाच्या वेळी आणखीन थोडे वजन कमी करा असं सांगण्यात येते, मात्र या चित्रपटाच्याबाबतीत आम्हाला वजन वाढवायचे होते. चित्रपटाच्या रीडिंग दरम्यान आम्ही खूप वेगवेगळे पदार्थ खात होतो. या चित्रपटासाठी मी 17 किलो वजन वाढवले होते. माझ्या पूर्ण करियरमध्ये असा चित्रपट मी केला नाही, कारण मला नेहमी वजन कमी कर हेच सांगत असतं. या चित्रपटाची पटकथा मी रीलेट करते. या चित्रपटातून आम्हाला एक छान संदेश द्यायचा आहे.' (Sonakshi Sinha Opene Up About Why She Choose Double Xl Film and on weight gain)
दरम्यान, 'डबल एक्सएल' हा एक विनोदी चित्रपट असून तो 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनाक्षी आणि हुमाच्या त्यांच्यासोबत अभिनेता झहीर इक्बाल आणि महत राधवेंद्र दिसणार आहेत. या दोन कलाकारांशिवाय या चित्रपटात क्रिकेटर शिखर धवनही दिसणार आहे. शिखर या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे.