मुंबई : नुकतीच सोनी टीव्हीवर सुरू झालेली मालिका 'पहरेदार पिया की' बरीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर अनेकांकडून या सिरीयलवर चर्चा होत आहे.
या मालिकेत १० वर्षाच्या मुलाला तिचा पिया म्हणजे बॉयफ्रेंड दाखवंल आहे. तर १८ वर्षाच्या मुलीला त्याची पहरेदारच्या भूमिकेत दाखवण्यात आलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे या मालिकेत १० वर्षाच्या मुलाची त्या १८ वर्षाच्या मुलीशी विवाह लावू दिला. सोशल मीडिया आणि मीडियाकडून होणाऱ्या विरोधांमुळे ही मालिका चर्चेत राहिली आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत मधुचंद्राची रात्र दाखवण्याचा सीन शुट करण्यात आला. आणि या सीनमध्ये १० वर्षाचा मुलगा आणि १८ वर्षाची मुलगी यांच्यात हनीमूनचा सीन दाखवण्यात आला. आणि या सीनने एकच गोंधळ निर्माण झाला. अनेक प्रेक्षकांनी या सीनवर आक्षेप नोंदवला. आणि त्यानंतर अशी माहिती समोर आली की आता या हनीमूनच्या सीनचा सिक्वल शूट करणार आहेत. आणि हे ऐकून साऱ्यांचाच पारा चढला आणि त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला.
रिपोर्टनुसार, आता प्रेक्षक एकत्र येऊन ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे त्यांनी आपलं ही मत स्मृती ईरानी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. change.org या वेसाइटवर एका प्रेक्षकाने मालिका बंद करण्यासाठी कॅम्पेन सुरू केलं आहे. आणि या याचिकेवर जवळपास ५५ हजार लोकांनी स्वाक्षरी देऊन आपलं मत नोंदवलं आहे. आणि आता हे कॅम्पेन वाढतच चाललं आहे.
या मालिकेत ९ वर्षाचा मुलगा आहे ज्याला १८ वर्षाच्या मुलीशी प्रेम होतं. एवढंच नाही तर आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या या मुलीला तो लग्नासाठी प्रपोझ देखील करतो. आणि मग दोघांचं लग्न होतं. या मालिकेत अभिनेत्री तेजस्वी प्रकाश वयंगंकर ही १८ वर्षाची राजकुमारी दिया सिंहचं पात्र साकारत आहे तर हा मुलगा १० वर्षाच्या नवऱ्याचं. चाईल्ड अॅक्टर अफान खान मालिकेत राजकुमार रतन सिंहची भूमिका साकारत आहेत.