अथियाला लगीन घाई...? लेकीच्या लग्नावर सुनिल शेट्टी म्हणाला....

शेट्टी कुटुंबात वाजणार सनई चौघडे... सुनिल शेट्टीच्या वक्तव्यानंतर खळबळ  

Updated: Jul 13, 2022, 10:34 AM IST
अथियाला लगीन घाई...? लेकीच्या लग्नावर सुनिल शेट्टी म्हणाला.... title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरच्या लग्नानंतर सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगत आहे. काही वर्षांपासून क्रिकेटपटू केएल राहुल आणि अथिया शेट्टीला डेट करत असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. अफेअरच्या चर्चा रंगताचं दोघे लग्न कधी करणार असा प्रश्न चाहते सतत दोघांना विचारत आहेत. आता चाहत्यांना लवकरचं अथिया आणि केएल राहूलच्या लग्नाबद्दल माहिती मिळणार आहे. 

अथिया शेट्टी आणि केएल राहुल गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुल येत्या तीन महिन्यांत मुंबईत लग्न करणार असल्याचं समोर येत आहे. 

अथिया - केएल राहूल अडकणार विवाह बंधनात, लग्नाची तयारी सुरु

येत्या तीन महिन्यात अथिया आणि केएल राहूल लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगताचं सुनिल शेट्टीने सर्व रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. लेकीच्या लग्नाबद्दल तो म्हणाला, 'अद्याप लग्नाची कोणतीही तयारी सुरू नाही. तीन महिन्यात अथियाचं होणार नाही...' अशी माहिती अभिनेत्याने दिली आहे. 

दरम्यान, दोघांनी मुंबईत घर देखील घेतले आहे, जिथे ते लग्नानंतर राहणार असल्याच देखील समोर येत आहेत. सध्या त्यांच्या घराचं काम सुरू आहे. त्याचबरोबर अथिया स्वतः लग्नाच्या तयारीच्या कामाला लागली आहे. मात्र, दोघांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. 

आता सुनिलच्या वक्तव्यानंतर अथियाचं लग्न अद्याप ठरलं नसल्याचं कळत आहे. त्यामुळे अथिया आणि केएल राहूल कधी लग्न करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागल आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x