Hate Story 2 ची अभिनेत्री सुरवीन चावलाने गुपचूप केलं लग्न, पाहा फोटो

वर्ष संपता संपता अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले आहेत. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 28, 2017, 04:41 PM IST
Hate Story 2 ची अभिनेत्री सुरवीन चावलाने गुपचूप केलं लग्न, पाहा फोटो title=

मुंबई : वर्ष संपता संपता अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले आहेत. 

अनुष्काच्या पाठोपाठ आता सुरवीन चावला देखील लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सुरवीन चावलाने बिझनसमन अक्षय ठक्करसोबत लग्न केलं आहे.

INSIDE PICS Surveen Chawla’s wedding to Akshay Thakker was a dreamy affair

हेट स्टोरी 2 या सिनेमामुळे सुरवीन चावला खूप चर्चेत आली होती. 

INSIDE PICS Surveen Chawla’s wedding to Akshay Thakker was a dreamy affair
सुरवीनला कायमच व्हाईट गाऊनमध्ये लग्न करायचं होतं. त्यामुळे पंजाबी असून देखील तिने या अंदाजात लग्न केलं आहे. 

INSIDE PICS Surveen Chawla’s wedding to Akshay Thakker was a dreamy affair

गुरूवारी सुरवीनने फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने आपल्या नवऱ्याचं नाव देखील सांगितलं आहे. सुरवीनने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मेरा आधा तुम्हारा है, तुम्हारा आधा मेरा है, लेकिन जो मेरा है वह तुम्हारा है इसलिए सबकुछ तुम्हाला है.... 

INSIDE PICS Surveen Chawla’s wedding to Akshay Thakker was a dreamy affair

भले सुरवीनने आपल्या लग्नाची बातमी आता सांगितली असेल. मात्र मिळालेल्या माहितीनुसार तिचे लग्न 2 वर्षापूर्वीच झाले आहे. ज्या लग्नाला तिने आता जगासमोर आणले आहे. सुरवीनने इटलीमध्ये लग्न केलं असल्याची माहिती मिळाली आहे. 

INSIDE PICS Surveen Chawla’s wedding to Akshay Thakker was a dreamy affair

बुधवारी केलेल्या आपल्या ट्विटमध्ये तिने लिहिलं आहे की, और बस यूं ही, जिंदगी के किसी बेहद आम दिन.... प्यार ने हमें एक परियों की सी कहानी दे दी है.... या तिच्या मॅसेजसोबत #Married आणि #GiveUsYourLove&Blessings सारखे हॅशटॅग शेअर केलं आहे.

INSIDE PICS Surveen Chawla’s wedding to Akshay Thakker was a dreamy affair

सुरवीन चावला पार्च्ड, अगली आणि हेट स्टोरी 2 सारख्या सिनेमांमध्ये बोल्ड अवतारात दिसली होती. तसेच सुरवीनने पंजाबी अल्बम आणि अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

INSIDE PICS Surveen Chawla’s wedding to Akshay Thakker was a dreamy affair

सुरवीन लवकरच एकता कपूरच्या वेब सिरिज 'हक से' मध्ये अॅक्टर राजीव खंडेलवालसोहत दिसणार आहे. सुरवीनची ही पोस्ट अशावेळी आली जेव्हा, अभिनेत्री इलियाना डिक्रूजने आपल्या बॉयफ्रेंडला हबी बोलून सोशल मीडियावर टॅग केलं होतं. 

INSIDE PICS Surveen Chawla’s wedding to Akshay Thakker was a dreamy affair

सुरवीनच्या लग्नात अभिनेत्री रूबीना दिलेक, टीना, कृति केलकर सहभागी होत्या.